मॉब
लिंचिंग (पार्ट – १)
उत्तम मदने
पालघर मधील मॉब लिंचिंगच्या घटनेमुळे महाराष्ट्राबरोबरच देशभरातील
वातावरण खूप तापले आहे आणि यावर वेगवेगळ्या स्तरावर टीका होत आहे, व याला राजकीय,
धार्मिक व जातीय रंग दिले जात आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देश्यात
अशा स्वरूपाच्या घटना घडणे हे खूप गृहनास्पद आणि लाजिरवाणे आहे. मॉब लिंचिंगच्या अशा
घटना महाराष्ट्रात घडणे हि काही नवीन गोष्ट नाही, परंतु कोणत्या कारणामुळे मॉब
लिंचिंगच्या घटना कुणाबरोबर घडत आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे. आता पर्यंत
बऱ्याच ठिकाणी धार्मिक भेदभाव व धार्मिक तिरस्कारातून घटना घडलेल्या आपण पाहिल्या
आहेत, त्याच बरोबर जातीय भेदभाव व जातीय तिरस्कारातून हि मॉब लिंचिंगच्या खूप घटना
घडत आहेत, आणि पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रातही हे खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे.
जातीय व धार्मिक संघर्षाच्या व तिरस्काराच्या माध्यमातून जमावाने
केलेली हिंसा पाहिली तर शिख विरुद्ध १९८४, ख्रीश्चन आणि इतर विरुद्ध २००९,
मुस्लिमांविरुद्ध - गुजरात २००२, मुझ्झापानगर २०१३, बक्सा २०१३ तसेच दलितानविरूद्ध खूप ठिकाणी झालेली दिसून
येते. दलितांविरूद्ध ऐतिहासिक जातीय हिंसाचार,
ज्यात बलात्कार, खून आणि इतर प्रकारच्या शारीरिक हल्ल्यांचा समावेश आहे. ‘Amnesty International, India’
च्या रिपोर्ट नुसार भारतातील अशा गुन्ह्याच्या ७०% गुन्हे हे मागासलेल्या, दलित व
मुस्लीम समाजावर घडत आहेत.
अशा स्वरूपाच्या मॉब लिंचिंगच्या घटना का घडत आहेत? या पाठीमागे खरच
काही राजकारण आहे का? का, लोकं खूप निर्दयी होत चालली आहेत? लोकांना कायद्याची खरच
भिती राहिली नाही का? लोकं कायदा का हातात घेत आहेत? का, हे सर्व कोणी घडऊन आणत
आहे? या सर्व प्रश्नावरती सखोल विचार करणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर, आतापर्यंत महाराष्ट्रात अफवातून घडलेल्या मॉब
लिंचिंगच्या घटना पाहिल्या तर यात बळी
गेलेले लोकं कोण आहेत? आणि याच लोकांचा बळी का जात आहे? याचा विचार करणे हि खूप
गरजेचे आहे.
गडचिंचले, पालघर घटना:
१६ एप्रिल २०२० रात्री ११.३० च्या दरम्यान दोन साधू आणि त्यांच्या
गाडीचा चालक यांना जवळपास २०० लोकांच्या जमावाने दगड, काठ्या आणि सळयांनी ठेचून
मारले. हि घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले या गावात घडली. जसा
लॉक डाऊनचा काळ सुरु झाला होता तसी या
परिसरामध्ये whats app वर एक अफवा पसरत होती कि रात्रीच्या वेळी गावात साधू व
डॉक्टर च्या वेशात लहान मुलांची किडनी चोरण्यासाठी लोकं/चोर येत आहेत. या घटनेत
मारले गेलेले साधू सुरत ला त्यांच्याच परिचयातील एका साधूचा मृत्यू झाला होता
म्हणून त्यांच्या अंत विधीसाठी चालले होते.
या साधूंची गाडी गडचिंचले या आदिवाशी गावात पोहोचताच तिथे लॉक डाऊन
च्या काळात सुद्धा जमलेल्या जवळ पास २००
लोकांच्या जमावाने गाडी आडवली व जमावाने या साधू व त्यांच्या गाडीच्या चालकाला
मारण्यास सुरुवात केली. परिस्थिती खूपच गंभीर झालेली पाहून एका वन रक्षकाने तिथून
जवळच असलेल्या कासा पोलीस ठाण्यात कॉल करून घडत असलेल्या घटनेबद्दल माहिती दिली.
माहिती मिळताच कसलाही विलंब न करता पोलिसांच्या दोन सुमो गाड्या घटनास्थळी
पोहचल्या. गडचिंचले गावात पोहचताच पोलिसांनी साधू व गाडी चालक यांना ताब्यात घेतले
व गाडीत बसवले परंतु जमलेल्या जमावाने पोलिसांना न जुमानता पुन्हा साधू व गाडी
चालकास आपल्या ताब्यात घेतले आणि दगड, काठ्या आणि सळयाने मारण्यास सुरुवात केले
आणि आणि पोलिसांना न जुमानता त्यांना जीव जाई पर्यंत मारतच राहिले. हे साधू कोण
होते तर ते होते गोसावी समाजे, कि जो समाज महाराष्ट्र मध्ये भटके-विमुक्त या
सामाजिक प्र-वर्गात येतो.
राईनपाडा, धुळे घटना:
पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा मागून जगणारे पाच ते सात कुटुंब धुळे
जिल्ह्यातील साखरी तालुक्यामधील पिंपळनेर गावाबाहेर रस्त्यालगत आपली पाल टाकून
वास्तव्याला आली होती, व आजूबाजूच्या गावात भिक्षा मागून आपले जीवन जगत होती. १
जुले २०१८ रोजी या कुटुंबातील ७ सदस्य जवळच असलेल्या राईनपाडा या साक्री
तालुक्यातील आदीवाशी लोकांच्या गावात भिक्षा मागण्यासाठी गेले होते आणि त्याच
दिवशी त्या गावचा बाजार होता. याच भागामध्ये काही दिवसांपासून whats app वर एक
अफवा पसरत होती कि लहान मुलांना चोरणारी व त्यांच्या किडन्या काढून विकणारी टोळी
सक्रीय झाली आहे, अशा अफवांना whats app
वर पेव आला होता त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
राईनपाडा मध्ये बाजाराचा दिवस पाहून हे भिक्षेकरी तिथे भिक्षा मागण्यासाठी पोहचले
आणि लोकांना या भिक्षेकारांबद्दल काय वाटले याचा अंदाज भिक्षेकारांना येण्याच्या
अगोदरच स्थानिक लोकांनी भिक्षेकरी लोकांना मारण्यास सुरुवात केली. बाजाराचा दिवस
असल्यामुळे लोकांचा जमाव मोठा झाला आणि त्यांनी भिक्षेकरींना लाथा, बुक्या, दगडाने
मारण्यास सुरुवात केली. या सात भिक्षेकरी मधील दोघे जन पळून जाण्यास यशस्वी ठरले
परंतु जे पाच लोकं जमावाच्या हाती लागली त्यांना मार-हान करत जमावाने गावच्या
ग्रामपंचाय कार्यालयामध्ये कोंडून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी
पोहचले. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर हि जमावाने ग्रामपंचायत कार्यालयात
ठेवलेल्या लोकांना लाथा, बुक्या व दगडाने मारण्याचे बंद केले नाही. घटनास्थळी आठ
पोलीस असतानाही जमाव पोलिसांना न जुमानता या भिक्षेकरींना मारतच राहिला आणि शेवटी
यात भिक्षेकरी लोकांना पोलिसांच्या उपस्थितीत आपला जीव गमवावा लागला. हे भिक्षेकरी
लोकं कोण होते? तर ते होते, नाथ पंती डवरी गोसावी समाजाचे कि जो समाज महाराष्ट्रात
भटके-विमुक्त प्रवर्गामध्ये येतो. या हत्याकांडात मृत पावलेले लोकं सोलापूर मधील
मंगळवेढा तालुक्यातील खावे गावचे रहिवाशी होते.
कळमना, नागपूर घटना:
कळमना या नागपूर भागामध्ये चार लोकं साडी घालून भिक मागण्यासाठी
सुरवात करतात आणि त्याच वेळेस कळमना भागातील काही युवक त्या भागातील लोकांना अलर्ट
करतात आणि या चार लोकांचा पाठलाग करायला सुरवात करतात. काही दिवसांपासून या भागात
अफवा पसरत होती कि, काही लोकं महिलांचे दागिने चोरने, विनयभंग- बलात्कार करणे या
साठी फिरत आहेत आणि याच संशयातून या युवकांनी यांचा पाठलाग करण्यास सुरवात केली.
या पाठलाग करणाऱ्या युवकांच्या संखेत वाढ होत गेली आणि या जमावाने या लोकांना
मारण्यास सुरवात केली. हि घटना पोलिसांना समजताच पोलीस तिथे दाखल झाले परंतु
पोलिसांना न जुमानता या जमावाने चार पैकी तीन लोकांचा बळी घेतला त्यातील एकाला पोलीस
व्ह्यान मध्ये घालण्यात यशस्वी ठरल्याने त्याचा जीव वाचला. हे मरण पावलेले लोकं
कोण होते? तर ते होते बहुरूपी समाजातील कि जो समाज भटके-विमुक्त सामाजिक प्रवर्गात
येतो. हे सर्व लोकं मुळचे मोदीपुर गाव बुलढाणा येथील रहिवाशी होते.
वरील तिन्ही घटना पाहिल्या तर त्यातील पहिल्या दोन घटनामध्ये खूपच
साम्य आहे. ज्या गावांमध्ये ह्या घटना घडल्या ती गावे आदिवाशी गावे आहेत. ज्या
लोकांना मरेपर्यंत मारले ते लोकं भटके-विमुक्त प्रवर्गातील आहेत आणि ज्या
अफवानमुळे त्यांना मारले गेले त्या अफवा हि लहान मुल चोरणारी व त्यांच्या किडन्या
विकणाऱ्या टोळ्या फिरत आहेत अशा स्वरूपाच्या अफवा आहेत. तिसऱ्या घटने मध्ये हि
लोकांना मारले गेले तो भाग मात्र आदिवाशी नव्हता. परंतु अशा स्वरूपाच्या अफवातूनच
तोही प्रकार भटके विमुक्त लोकांबरोबर घडलेला आहे. ज्या-ज्या परिसरात अश्या अफवातून
मॉब लिंचिंगच्या घटना घडत आहेत तिथे तिथे एक तर भटके-विमुक्त किंवा मागास
प्रवर्गातील जातींच्या लोकांचाच बळी जात आहे.
सोशिअल मिडिया च्या माध्यमातून ज्या अफवा पसरत आहेत त्यांना बळी पडणारा
लोकंसमुदाय कि ज्यांचा सोशीअल मीडियाशी तसा फारसा सबंध येत नाही कारण पोटाची खळगी
भरणे हाच सर्वात मोठा प्रश्न अजून त्यांच्या समोर उभा आहे तो कसा सोडवावा याचे
उत्तर त्यांच्याकडे नाही. अशा अवस्थेत ते अजून सोशिअल मिडिया या प्रकारापर्यंत
पोहोचूच शकले नाहीत किंवा तो प्रकार काय आहे हेच आजून कित्येकांना माहित हि नाही,
परंतु त्याच सोशिअल मिडियाचा वापर करून बुद्धीचा वापर न करणार्यांमुळे आज त्यांना
आपला जीव गमवावा लागत आहे हे एक भयाण वास्तव आहे. अशा सोशियल मिडिया मधून
पसरलेल्या अफवामधून ज्यांचा बळी जात आहे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या
कुटुंबावर अजूनच भयंकर परिस्थिती ओढवत आहे व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
आता यातून सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो असा कि, अशा सोशिअल मिडिया मध्ये अफवा कोण तयार करत आहे व पसरवत आहे आणि
का? खरच पोलीस या गोष्टीचा शोध घेऊ शकत नाहीत का? आपली सायबर यंत्रणा एवढी कुचकामी
झाली आहे का?
या घटनांतून अजून एक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे या आदिवाशी
बांधवांनी टोकाच्या भूमिकेला जाने. आदिवाशी बांधवांची संस्कृती, परंपरा व वैशिष्टे
पाहिले तर आदिवाशी समुदाय हा लाजाळू आणि तसा फारसा इतर जगाशी संपर्कात न येणारा
समुदाय, मंग या समुदायाकडे अशी टोकाच्या भूमिकेला जाणारी ताकद कुठून येते. समजा, अशे
समजले कि या लोकांनी हे स्व: संरक्षणासाठी केले तर मंग या झालेल्या घटना पाहिल्या
तर अशे दिसते कि घटना घडत असतानी पोलीस त्या ठिकाणी पोहचलेले आहेत (संरक्षणासाठी) तरीही
पोलिसांच्या उपस्थितीत हा जमाव लोकांना जीव मरेपर्यत कसा काय मारू शकतो? का,
त्यांना अशा घटना करण्यासाठी कोणी प्रवृत्त करत आहे? पोलीस उपस्थित असताना यावर
काहीच एक्शन का घेऊ शकले नाहीत? लोकं कायदा का हातात घेत आहेत? त्यांना कायद्याची
भिती राहिली नाही का? सोशिअल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणे व अशा घटना घडऊन
कायदा कानून हातात घेणे, कायद्याची भिती नाहीशी करणे, पोलीस यंत्रणेला कुचकामी
ठरवणे हे सर्व करण्यासाठी समाजातील काही मास्टर माईनड तर काम करत नाहीत ना? अशा
स्वरूपाच्या घटना घडवणे व समाजात अराजकता माजवणे तेढ निर्माण करणे असा अजेंडा
राबवला जात आहे का? अशा सर्व प्रश्नावर सामान्य जनतेने चिकित्सक पणे विचार करणे
गरजेचे आहे.
या समाज व्यवस्थेने भटक्या
विमुक्तांना या समाजात जे स्थान दिले आहे व समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा जो
दृष्टीकोन समाज व्यवस्थेने तयार केला आहे यावर मात करून स्वत: ला विकास प्रवाहात
आणणे हे त्याच्यासाठी खूप मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
(या राईटअप मध्ये उपस्थिती केलेल्या
सर्व प्रश्नाची उत्तरे पार्ट – २ मध्ये विस्ताराने येतील)
भटके-विमुक्त समाजाचे दिवस कधी बदलतील
ReplyDelete