About me

Sunday, 19 July 2020

“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - १)

“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” या विषयावर एम. एन. टी. न्यूज नेटवर्क या यूट्यूब चैनल वर दिनांक 14/07/2020 रोजी परिचर्चा आयोजित केलेली होती या परीचर्चेचे TRANSCRIPTION इथे दिलेले आहे

(हि एकच परिचर्चा TRANSCRIPTION करून ब्लॉग वरती तीन भागात विभागून दिलेली आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी).


Nomadic and De-notified Tribes - Constitutional Rights

सूत्रसंचालक (मा. विशाल गाईकवाड): सर्वांना जय भीम, जय मूलनिवासी. आपल्या सर्वांचे एम.एन.टी. न्यूज नेटवर्क या यूट्यूब चैनल आणि फेसबुक पेज वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोतकि जो भारतातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज आपण घेतलेला विषय आहे, “फुले-आंबेडकरी विचारानेच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार मिळू शकतात”. हा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय आपण येथे परीचर्चेसाठी घेतलेला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासकांना आणि विचारवंतांना बोलावलेल आहे, आपण सर्वप्रथम त्यांचे स्वागत करूयात आणि एकेकाची ओळख करून घेऊयात. सर्वप्रथम आहेत ते, मा. उत्तम मदनेत्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून संशोधनाचं काम केलेल आहे, शिक्षण घेत आहेत, त्यांनी परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण व संशोधनाचे कार्य केल आहे, तसेच ते  भटक्या विमुक्त समाजावर अभ्यास करत आहेत. सर तुमचं स्वागत आहे. 

आमचे दुसरे पॅनलिस्ट आहेत डॉ. विजय माने, डॉ. विजय माने सर हे भटके-विमुक्त समाजाचे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ते पुणे येथे वास्तव्यास आहेत, खूप संघर्षातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेल आहे आणि आपल्या समाजासाठी ते झटत आहेत. येथे एम. एम. टी. न्यूज नेटवर्क चैनल वरती त्यांच वक्ता म्हणून स्वागत करतो. 

त्याचबरोबर आमचे तिसरे पॅनलिस्ट आहेत ते म्हणजे, मा. धनंजय झाकर्डे साहेब, धनंजय झाकर्डे सरांचा सुद्धा भटक्या-विमुक्त समाजाच्या चालीरीती संदर्भात दांडगा अभ्यास आहे. त्याचबरोबर ते मूलनिवासी सभ्यता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

आमचे चौथे पॅनलिस्ट आहेत ते आपणा सर्वांचे परिचित असणारे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेते व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. उल्हास राठोड साहेब, त्यांचेही मी स्वागत करतो, उल्हास राठोड साहेब हे मुंबई येथील ओबीसी सत्यशोधक परिषदेचे सदस्य आहेत, भटके-विमुक्त इंटलेक्च्युअल फोरमचे महत्त्वपूर्ण अभ्यासक आहेत. त्यांच मी इथे  एम एन टी नेटवर्क चैनल वरती स्वागत करतो. 

आमच्या सर्व दर्शकांना आवाहन आहे की आपला जो एम. एन. टी. न्यूज नेटवर्क चैनल आहे तो बहुजनांसाठी निर्माण केलेला आहे. आपण आता जो लाईव्ह कार्यक्रम पाहत आहात तो फेसबुकच्या विविध ग्रुप वरती शेअर करू शकतालाईक करू शकता, कमेंट करू शकतामी आपणा सर्वांना विनंती करतो की, आपले चैनल आपणच वाढवले पाहिजे जे अत्यंत महत्त्वपूर्ण विषय चर्चेसाठी घेत आहे, अशे विषय मेनस्ट्रीम मीडिया कधीच चर्चेसाठी घेत नाही, असे महत्त्वपूर्ण विषय आपल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी मी सर्व दर्शकांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त शेअर करा. 

कार्यक्रमाला सुरुवात करताना सर्वप्रथम मी धनंजय झाकर्डे साहेब यांना प्रश्न विचारतोझाकर्डे साहेब, जो भटका विमुक्त समाज आहे याची देशपातळीवर नेमकी काय ओळख आहे? आणि महाराष्ट्र मध्ये नेमकी काय ओळख आहे? या संदर्भामध्ये आमचा जो बहुजन मूलनिवासी समाज आहे यांना महत्वपूर्ण अशी विस्तृत माहिती द्यावी ही विनंती. 

माननीय धनंजय झाकर्डे:  आपला प्रश्‍न हा भटके-विमुक्त समाजाच्या अनुषंगाने आहे की समग्रह बहुजन मूलनिवासी समाजाच्या अनुषंगाने आहे?

सूत्रसंचालक : हो सर, राष्ट्रीय स्तरावर भटका विमुक्त समाज कसा आहे, त्याची स्थिती, आणि महाराष्ट्र स्तरावर भटका विमुक्त समाज कसा आहे, आणि त्याची स्थिती?

 मा. धनंजय झाकर्डे:  ओकेमी पहिल्यांदा एम. एन. टी. न्यूज नेटवर्क चे आभार मानतो आणि आपण अत्यंत महत्त्वाची चर्चा ठेवलेले आहे की, फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क बहाल करू शकतात. हे अत्यंत सत्य आहे, त्याबद्दल मी एम. एन. टी. न्यूज नेटवर्क चे पुन्हा एकदा आभार मानून भटक्या-विमुक्त समाजाच्या अनुषंगाने मांडणी करतो. मध्यंतरी रेणके आयोग आला आणि या आयोगाने घुमंतू जातीया अशी एक वर्गवारी केली या अनुषंगाने केंद्राकडून पाऊल उचलण्याचा प्रयत्न झालेला आहे...... एकूण हा पुन्हा वेगळा वर्ग नाहीयेहा एक एस्सी. एसटी. ओबीसी. पैकीच एक वर्ग आहेजे तीन  संविधानिक वर्ग निर्माण झालेले आहेत ... 341, 342, 343 या कलमाच्या अंतर्गत. या देशातील राज्यकर्त्यांची एक मोठी चाल आहे की त्यांनी हा एक चौथा वर्ग निर्माण करून ठेवला. या वर्गाचे जे जीवनमान आहे त्या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी मी एक कविता केलेले आहे ती म्हणजेकोण आम्ही ......कोण आम्ही .....ओळख न आम्हाला.......  गावात ......न जंगलात.... नाही गावाच्या बाजूला......., कुणी म्हणते गुन्हेगार...... कुणी म्हणे वनवासी,.....उपरे ठरलो आम्ही इथले मूलनिवासी. जागा नाही राहायला..... कोण आम्ही .....कोण आम्ही ......ओळख नाही  आम्हाला.... ना गावात ना.... जंगलात..... जागा नाही राहायला आम्हाला. 

भारतामध्ये आजच्या स्थितीला जे भटके-विमुक्त म्हणून ओळखले जातात त्यांची ही ओळख आहे. तसेच त्यांना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या पाठीमागचा तो तगादा अजून संपला नाही.  बाबासाहेबांनी त्याकाळी जराईनपेशा या टरमिनोलॉजीच्या अनुषंगाने आदिम जमातीजराईनपेशा आणि अस्पृश्य वर्ग असे भाग केले. या तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं आहे, यामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये ज्याला जराइनपेशा म्हटलं जायचं ते म्हणजे गुन्हेगारी जमाती. यांची गुन्हेगारी जमाती म्हणून ओळख आहे आणि त्या काही प्रमाणात भटक्या आहेत, म्हणजे यांची नेमखी ओळखत नाही, परंतु यांना सर्वसाधारणपणे गुन्हेगार समजलं जातं. हे सर्व लोक आहेत ते या देशातले मूळनिवासी आहेत. त्यांचे सर्व  कॅराकस्टरीस्टिक संविधानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते ओबीसी सोबत जुळतात, आदिवासी सोबत जुळतात, आणि काही एस्सी सोबत जुळतात. 

तसं बाबासाहेबांनी सायमन कमिशन मध्ये सांगितलसायमन कमिशन ने बाबासाहेबांना प्रश्न विचारला कीआदिम समाजातील लोक अस्पृश्य आहेत का? तर बाबासाहेब म्हणाले, होकाही ठिकाणी त्यांच्याबरोबर अस्पृश्यतेचा व्यवहार होतोहे आहेच पण त्याच्याशिवाययांच्याकडे पाहण्याची गुन्हेगारीची जी नजर आहे त्यामुळे तर यांना जास्त सोसावं लागलं. मी एक वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोमी सांगलीमध्ये आरोग्य सेवेत कामाला होतोतर त्या ठिकाणी फासे पारधी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, काही ठिकाणी तो शेड्युल कास्ट मध्ये येतो तर काही ठिकाणी तो गुन्हेगार म्हणून समजला जातो. त्या ठिकाणी मी माझी ओळख पारधी म्हणून सांगायचो तर ते लोकांना पटायचं नाही. तशी माझी जात टाकणकर येतेपण टाकणकर म्हटल्यानंतर लोकांना समजत नाही. टाकणकर ही पारधी यामध्ये एक उपजात आहे. जेव्हा मी सांगतो की मी पारधी समाजातील आहे, तेव्हा ते लोकांना पटत नाही. कारण माझ राहणीमान, बोलणे, यामुळे. एका ठिकाणी असा अनुभव आला की एका घरी चहा पिण्यासाठी गेल्यानंतर तिथल्या महिलेने विचारले की हे तुमचे आडनाव इकडे कुठं बौद्ध धर्मामध्ये दिसत नाहीमग तुमची ही आडनावं कशी कायमग मी त्यांना सांगितलं की आम्ही पारधी आहोत, कारण जय-भीम म्हणत असल्यामुळे तिला असं वाटलं की हे बौद्ध आहेत. पण जेव्हा मी सांगितलं की मी पारधी समाजातला आहे तेव्हा ती अक्षरशः बेशुद्धच पडली, तिला आम्हाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले आणि हातातला चहा हातातच राहिला. तर अशाप्रकारे हि जी तिरस्काराची भावना आहे ती तिरस्काराची भावना एकूणच पूर्ण देशभर भटक्या-विमुक्तांच्या संदर्भात दिसून येते आणि एकूणच भारतात या भटक्या-विमुक्तांची एक प्रकारची अशी कोणतीच ओळख निर्माण झालेले नाही. त्यामुळे त्यांना जर न्याय हक्क मिळवायचे असतील तर त्यांनी फुले-आंबेडकरी वादाकडे पाहिला पाहिजे, फुले आंबेडकरी विचार स्वीकारला पाहिजेतो विचार स्वीकारून त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे, तरच त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवता येतील असं मला वाटतं. 

सूत्रसंचालक: ओके सरबाकी गोष्टी पुढच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला विचारण्यात येईलच. मी पुढच्या वक्त्यांना आमंत्रित करतो. मा. उत्तम मदने सर आहेत ते रिसर्च स्कॉलर आहेतत्यांचा या क्षेत्रामध्ये खूप अभ्यास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल्स या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अस दिलेल आहे की, आपल्या देशांमध्ये जो एक मोठा वर्ग आहे तो भटक्या-विमुक्त वर्ग आहे, आदिवासी वर्ग आहे, आणि अस्पृश्य वर्ग आहे. त्याच्या प्रस्तावना मध्ये बाबासाहेब सांगतात की, ही जी अस्पृश्यता आहे ती चुकीची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात ही अस्पृश्यता चुकीचे आहे, एवढा मोठा वर्ग आपल्या समाजामध्ये आहे आणि या अस्पृश्यतेचा उगम कुठून झाला याचा अभ्यास अजून कोणीही केलेला नाही, आणि त्यामुळे त्याचं खरं स्वरूप काय आहेती किती वाईट गोष्ट आहे, याची जाणीवच होत नाही. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की अस्पृश्यता असणे हा आमच्या जिवनाचा एक भागच आहे. तसच भटका विमुक्त समाजही आपला देशांमध्ये आहे, आणि त्या समाजाच्या ही काही व्यथा आहेत, आणि त्यांच्याबरोबर आज पर्यंत जे काही घडल आहे ते चुकीच आहे, अशी भावना आपल्या देशांमध्ये उभी करण्यात आलेले नाहीये. कारण आपल्या देशांमध्ये याच्यावरती विविधांगी असा अभ्यास झालेला नाहीये, किंवा लोकांना त्यासंदर्भात जागृत केलं गेलेलं नाहीये. तर मा. मदने सरांना माझा असा प्रश्न आहे कि रिसर्च स्कॉलर म्हणून भटक्या विमुक्त समाजाची परस्थिती काय जाणवते? भटक्या-विमुक्त समाजाचे खरे प्रश्न काय आहेत? आणि त्याला कशा पद्धतीने तुम्ही पाहता

मा. उत्तम मदने: तसं पाहायला गेलं तर भटक्या विमुक्तांच आत्ता सध्याचे चित्र हे खूपच विदारक चित्र आहेभटक्या-विमुक्तांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर त्यांचे सामाजिक प्रश्न काय आहेत, आर्थिक प्रश्न काय आहेत, शैक्षणिक प्रश्न काय आहेत, आरोग्याचे प्रश्न काय आहेत, किंवा एकंदरीतच त्यांच्या हक्काचे प्रश्न काय आहेत, अशा अनुषंगाने पाहायला गेलं तर या प्रश्नांची खूप मोठी अशी लिस्ट बनू शकते. आपण जर सामाजिक प्रश्नाच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलो तर, आज भटके-विमुक्त म्हणून महाराष्ट्रामध्ये 14 मूळच्या विमुक्त जाती आणि 28 या मूळच्या भटक्या जमाती आहेत, आणि कालांतराने त्यामध्ये वाढ होत गेलेली आहे. मग ते 1990 ला असेल, 1993 - 94 च्या दरम्यान असेलतर अशा पद्धतीने ते वारंवार वाढ होत केलेले आहे. आजतागायत जर गव्हर्मेंट रेकॉर्ड नुसार पाहायल गेलं तर, 14 विमुक्त जाती आणि 37 ह्या भटक्या जाती पाहायला मिळतात, या मेन जाती आहेत परंतु या जातींच्या सब जाती खूप साऱ्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला भटक्या-विमुक्तांनमध्ये येणाऱ्या खूप साऱ्या जाती आणि खूप सारी लोकसंख्या महाराष्ट्र मध्ये आणि एकंदरीतच भारतामध्ये पाहायला मिळते. सामाजिक प्रश्नाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहायला गेलं तर, वेगवेगळ्या सिच्युअशन किंवा परिस्थितीमध्ये भटक्या-विमुक्त समाजाचे आपल्याला एक्ष्क्लुजन झालेलं दिसतंमग समाजामध्ये एकंदरीतच त्यांच्यावर आपल्याला वेगवेगळे व्हायलन्स होताना दिसत आहेत, त्यांच्यासाठी प्रोटेक्शन काही नाही आहे. आता रिसेंट ची घटना पाहिल्या तर, बीडमध्ये केज मध्ये पारधी समाजावर झालेला हल्ला असेल किंवा मंगळवेढा तालुक्यातील जे भिक्षेकरी भिक्षा मागण्यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये आलेले होते त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेल मॉब लिंचींग असेल, अशा खूप सार्‍या घटना आपल्याला भटक्यांन बरोबर गावोगावी झालेल्या पाहायला मिळत आहेत. अशाप्रकारे व्हायलन्स भटके-विमुक्त लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर सोसावा लागत आहे. 

त्याचबरोबर ज्या विमुक्त जाती आहेत त्या 1871 पासून ब्रिटिशांनी जो क्रिमिनल ट्रायब ॲक्ट बनवला तेव्हापासून भटक्या-विमुक्त समाजावर जो गुन्हेगारीचा शिक्का बसलेला आहे, या गुन्हेगाराच्या शिक्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप सार्‍या समस्या येत आहेत, आणि त्यांना त्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्यावर बसल्यामुळे पूर्ण समाज त्यांच्याकडे गुन्हेगार नजरेतून पाहत आहे, एक व्यक्ती, दोन व्यक्ती गुन्हेगार न करता पूर्ण समाजच आज गुन्हेगार ठरवला जात आहे, याचाही खूप मोठा फटका भटक्या विमुक्त समाजाला बसत आहे. त्याचबरोबर लॅक ऑफ एज्युकेशन हा एक मोठा प्रश्न भटक्या विमुक्त समाजाला भेडसावत आहे, मंग हे भटके-विमुक्त लोक म्हणजे कोण आहेततर भटके म्हणजे असे लोक की जे लोक एका गावाहून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा गावातून शहरात भटकंती करत आहेत आणि आपला उदरनिर्वाह शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, मग तो उदरनिर्वाह या समाजव्यवस्थेने त्यांच्यावर ओढून दिलेल्या परिस्थितीमुळे असेल किंवा त्यांच्या परंपरागत व्यवसाय आहेत ते व्यवसाय करून ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेतभटक्या-विमुक्त समाजातील लोकांकडे स्वत:च अस घर नाही, जमीन नाही, त्यामुळे त्याचे वास्तव्याचे अशे प्रमुख ठिकाण नाही. अशा या सततच्या भटकंतीच्या परिस्थितीमध्ये त्यांची मुलं शिक्षण कुठे घेतले, भटक्या विमुक्त समाजापैकी खूप थोडे लोकं एका ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आणि मेजॉरिटी समाज अजूनही भटकंती अवस्थेतच आहे. तर मग अशा या भटकंतीच्या अवस्थेमध्ये या समाजातील मुलं रेगुलर स्कूलमधून शिक्षण कसे काय घेऊ शकतील? अशा प्रकारे ही शिक्षणाची एक समस्या त्यांना भेडसावत आहे. 

आरोग्याच्या संदर्भात जर विचार करायला गेलं तर कुठेच एका गावच रहिवासी नाही, सतत भटकंती आहे, त्यामुळे ऊन वारा पाऊस त्यांना सहन करावा लागत आहे. पालावरचं जीवन जगावे लागत आहे, आणि या भटकंतीच्या दरम्यान त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अब्युजिंग चे प्रकार होत आहेत आणि प्रामुख्याने भटक्या-विमुक्त समाजातील मुली आणि महिला या अब्युजिंगला बळी पडताना दिसतात. या समस्या बरोबरच जे पब्लिक प्लेसेस आहेत किंवा कॉमन रिसोर्सेस आहेत की ज्यांच्यावर सर्वांचा हक्क आहे, अशा कॉमन रिसोर्सेसचा ॲक्सेस भटक्या-विमुक्त लोकांना मिळतच नाही. खूप रेअर  ठिकाणचे खूप रेअर लोक आहेत की ते कॉमन रिसोर्सेसचा फायदा उठवत आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला अशा प्रकारच्या खूप समस्या पाहायला मिळतात. 

आर्थिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर, आजच्या मॉडर्ननायझेषणच्या युगामध्ये भटका विमुक्त समाज त्यांचे परंपरागत व्यवसाय करत आहे ते व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे, हे परंपरागत व्यवसाय कोणते तर, डोंबारी, माकडवाले, अस्वल वाले, कोल्हाटी, सापवले इत्यादी. आपण जर या समुदायाला त्यांच्या व्यवसायानुसार विभागणी केली तर करमणूक करून पोट भरणारे भटके, प्राण्यांच्या किंवा पक्षांच्या सहकार्याने जीवन जगणारे भटके, पशुपालक किंवा प्राण्याच्या साह्याने जगणारे किंवा जंगलातील वस्तूंवर उदरनिर्वाह करणारे भटके, अशा प्रकारे आपल्याला भटक्या-विमुक्तांच्या त्यांच्या व्यवसायानुसार कॅटेगरी करता येतील, काही भटक्या विमुक्त जाती अशा आहेत की त्या फक्त भिक्षा मागूनच जगत आहेत. अशा प्रकारे आपण भटक्यांना वेगवेगळ्या गटात व्यवसायानुसार विभागणी करून पाहू शकतो, या व्यवसायाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर आपल्याला वेगवेगळे कायदे येतानी दिसत आहेत. पक्ष्यांच्या संदर्भात कायदे आलेले आहेत, फोरेस्ट संदर्भात कायदे आलेले आहेत, या कायद्यामुळे भटके-विमुक्त लोकांवरती वेगवेगळे निर्बंध आलेले आहेत, हे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे खेळ करू शकत नाहीत, पोलिस येतात आणि डायरेक्ट त्यांना उचलतात. भिक्षा मागून जगणारा खूप मोठा समाज आहे परंतु आज आपल्याकडे त्या संदर्भात कायदा असल्यामुळे भिक्षा मागणाऱ्या समाजावर..................................................

सूत्रसंचालक: मदने सर, मदने सर, मी तुम्हाला येथे थांबवतो, पुढे आपल्याला आणखीन या विषयावर चर्चा करायचीच आहे. पुढच्या राउंडला पण या वरती चर्चा करूयात. आता मी डॉक्टर विजय माने सरांकडे येत आहे, डॉक्टर माने सर, आपण खूप खडतर प्रवास करून वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलेले आहे.  आपल्याला असं दिसतंय की आदिवासी समाज हा कमीत कमी जंगलामध्ये कुठेतरी स्थायी झालेला आहेओबीसी समाज आहे, शेड्युल कास्ट समाज आहे, तोही एका ठिकाणी स्थायिक झालेला आहे. परंतु भटका विमुक्त समाज तांड्यावर राहतो आणि वर्षातून अनेक वेळा स्थलांतर करत राहतोना त्याच्याकडे रेशन कार्ड आहेना आधार कार्ड आहे. त्याच्याकडे त्याची ओळख स्थापित करण्यासाठी कोणतेच असे डॉक्युमेंट नाहीये. अशा समाजाच्या युवकांनी उच्च शिक्षण घेतल्याशिवाय त्त्यांची प्रगती कशी होईल? आपण त्याच्या संदर्भामध्ये माहिती द्यावी. 

डॉ. विजय माने: सर्वप्रथम मी एम. एन.  टी. न्यूज नेटवर्क चैनलच आभार मानतो, त्यांनी मला या कार्यक्रमांमध्ये बोलावलं. तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याच्या अगोदर झाकर्डे  सरांनी जी पार्श्वभूमी सांगितली, समाज तीन भागात कसा विभागला गेला. एकसंघता कशी तोडली जाते. मदने सरांनी भटके विमुक्तांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, हक्क, इतिहास याच्या बद्दल सांगितलं. आपल्याला माहित आहे कि अनादी काळापासून भटके-विमुक्त हे अनेक ग्रुपमध्ये विभागले आहेत, आणि त्याच्यामुळे काय झालेला आहे, त्यांना एका ठिकाणी राहता येत नाही, त्यांचे प्रश्न आहेत ते कागदपत्रांचे आणि त्यांच्या आयडेंटिटी चेकागदपत्र मिळवून देण्यासाठी काही संस्था काम करत आहेत, परंतु लोकांची पण जबाबदारी आहे की त्या संस्थांना कस भेटल पाहिजे. मुलांना शिक्षण देण्यासाठी भविष्यात त्यांना कागदपत्रांचा उपयोग होऊ शकतो. कागदपत्र नसेल तर शिक्षणासाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. शिक्षण नसेल तर आपन वंचित राहू शकतो आणि वंचित राहिल्यामुळे समाजात काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे आपल्याला माहीतच आहे.  (भाग -२ वाचा)

“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - १) 


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - २) 


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - ३) 


3 comments:

  1. खूप परिश्रमपूर्वक लिखित दस्तऐवज तयार करत आहात..
    कष्ट घेण्याची आपली सवय एक दिवस खूप उंचीवर नेणार आहे सर.... सदिच्छा...!

    ReplyDelete

Please give your valuable comment on the write-up and Share it on Whatsapp, Facebook, Twitter, etc. / कृपया लेखनावर आपली मौल्यवान टिप्पणी द्या आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी वर शेर करा.