सूत्रसंचालक : हो सर, तुम्हाला तोच प्रश्न आहे की आज तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेऊन पुण्यामध्ये एक नामांकित डॉक्टर आहात आपल्याला हा जो समाज आहे तर या समाजामध्ये किती मुलं शालेय शिक्षण घेऊ शकतात आणि हे शिक्षण घेण्यासाठी भटक्या-विमुक्तांच्या मुलांना काय समस्या येतात हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल.
डॉ. विजय माने: जसं मी म्हटलं की, कागदपत्रांशिवाय मुलांना ओळख
नसते आणि त्यांना शाळेत पण जाता येणार नाही. शाळेत न
गेल्यामुळे मुलं वंचित राहू शकतात आणि आपण जे म्हणतो उच्च-शिक्षण, उच्च शिक्षणासाठी आज काल पाहिल तर खूप कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण सगळ्याच मुलांना मेडिकल मिळेल किंवा इंजिनिअरिंग मिळेल हे शक्य नाही. मग आपण त्यातून काय करू शकतो. गव्हर्मेंट
सगळ्यांना जॉब देऊ शकत नाही तर आपण इतर काय उपाययोजना करू शकतो याबद्दल विचार
करावा असं मला वाटतं.
सूत्रसंचालक: धन्यवाद
सर, मी आता पुढील चौथे पॅनलिस्ट
आहे, ते राठोड सर, हे ह्या विषयातील अभ्यासक आहेत, आपल्याला प्रश्न
विचारताना मी माहिती सांगू इच्शछितो, कि महाराष्ट्रमध्ये जो धोबी/ परीट समाज आहे. व इतर
प्रांतांमध्ये बिहार असेल, मध्यप्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल येथील धोबी समाज
अनुसूचित जातीमध्ये येतो. परंतु महाराष्ट्रात आल्यानंतर
हे ओबीसी मध्ये येतात. आणि त्याच्यामुळे भारतातील इतर
भागातील धोबी समाज आणि महाराष्ट्रातील समाज एकत्रित येत नाही किंवा इथला धोबी समाज
इतर राज्यातील समाजा बरोबर एकत्रीकरण करत नाही, अशीच परिस्थिती आपल्याला भटके-विमुक्त समाजामध्ये सुद्धा दिसते, तर हा एवढ्या मोठ्या प्रमाणात विघटित झालेला जो भटके विमुक्सत समाज आहे या समाजाला संघटित
करण्यासाठी कोणत्या मुद्द्यांवर आपण त्यांना संघटित करू शकतो यावर मार्गदर्शन
करावे.
मा. उल्हास राठोड: जय भीम, संघटित करण्याच एक सूत्र असायला पाहिजे, हे काम तुमच्या-आमच्यापैकी जे चळवळीचे लोक आहोत, विद्वान
माणसे आहोत यांनी हे केलं पाहिजे. जसे आपण या पॅनलवर इतके लोक आहेत हे त्याचं काम आहे. भटक्या विमुक्तांची चळवळ गेले
पन्नास वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे. 1871 पासून ही मंडळी सर्व गुन्हेगार
म्हणून जेलमध्ये होते. 1952 मध्ये खरं स्वातंत्र्य या
लोकांना मिळालेलं आहे, त्यामुळे संविधान कसं झालं, भारताला स्वातंत्र्य कसे मिळाल, याची काही माहिती या
समाजाला नव्हती. यामध्ये विशेष करून पहिल्या ज्या 14 जाती आहेत त्यांना आपण
विमुक्त म्हणतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस
कायदेमंत्री होते. भारत स्वतंत्र होऊनही हा समाज अजून जेलमध्ये आहे आणि या समाजाला
बाहेर काढायल पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी
शिफारस केली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर मध्ये येऊन तारेची कुंपण तोडली आणि समाजाला बाहेर काढलं.
त्यांनी त्या त्या राज्याच्या सरकारला आदेश दिले होते की या लोकांना एससी-एसटी
मध्ये घाला आणि त्यांचे संविधानिक अधिकार मजबूत करा. परंतु
असं झालं की इतक्या वर्षानंतरही भटका विमुक्त समाज अजून स्वातंत्र्याची पोळी खाऊ
शकत नाही, तो स्वतंत्र जीवन जगू शकत नाही, या देशातला
भटका विमुक्त समाज या देशाचे नागरिकत्व सुद्धा पत्करू शकत नाही. यामध्ये एकता
राहिलेले नाही. त्यांच्याकडे नागरिकत्वाच काहीतरी कागदपत्र हव आहे, त्यावेळेस वसाहतीतून बाहेर पडले तेव्हा त्यांना
कोणताही दाखला दिला गेला नाही, जर त्यावेळेस ते सर्टिफिकेट
दिल असतं तर कमीतकमी हे भारताचे नागरिक आहेत हे तरी लोकांना कळलं असतं. भटक्या
विमुक्त समाजाला जे प्रतिनिधी हवे होते ते प्रतिनिधी
सुद्धा आतच असल्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाच कोणीच प्रतिनिधित्व करू शकलं नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणतरी होते
आणि त्यांनी संविधान लिहिले यांची ओळखही त्या लोकांना वसाहतींमध्ये नव्हती. पण भटक्या-विमुक्तांनी हे समजून घेतलं पाहिजे
की बाबासाहेबांनी आम्हाला इंग्रजांनी डांबून ठेवलेल्या या वसाहती मधून बाहेर काढण्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला होता. संविधानामध्ये आजही आम्हाला सर्व हक्क प्राप्त होऊ शकतात परंतु प्रश्न आहे
की आंबेडकरी विचारधारा जोपर्यंत आम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत संविधानिक
हक्कापर्यंत जाता येणार नाही. आतापर्यंत सर्व वक्त्यांनी सांगितलं आहे कि आमची अवस्था ना घर का
ना घाट का अशी आहे, आमच्यामध्ये
एक वाक्यता नाही.
आमच्या
भटक्यांची अवस्था काय आहे, आमचा भटका काय करतो, सकाळी
चार वाजता डुकऱ्या वाजवतो, पाच वाजता मसनजोगी येतो, सहा वाजता कोणी येतो, सात वाजता आमचा बहुरूपी येतो
अशा प्रकारे दिवसभर 24 तास भटक्यांचे एक वेळापत्रक बनलेल आहे. रात्री दोन वाजता
आमचा पारधी येऊन हल्ला करून डाका मारून तो शेवटचा झोपतो. सकाळ-दुपार-संध्याकाळ सगळ्यांना वाटण्या करुन दिलेल्या आहेत.
हे इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेली आमची परिस्थिती आहे. या व्यवस्थेतून जर बाहेर पडायचं असेल तर या पारंपारिक
व्यवसायांना लाथाडलं पाहिजे. आता आम्ही संविधानिक राज्यामध्ये राहतो, आता आम्हाला कोठेही नोकरी करण्याचा हक्क आहे. आम्हाला वाटेल तसा आमचा व्यवसाय
सुरू करण्याचा अधिकार आहे. आमच्या मध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक कुशल गट आहे आणि एक अकुशल गट आहे. आमच्या मध्ये जे लोक कुशल आहेत ते
घिसाडी आहेत, काही अवजारे बनवणारे, काही
लोक आमच्या नावावर करोडो रुपये कमवून त्यांची तिजोरी भरत आहेत. आमची कला आम्हाला
जोपासण्यासाठी आम्ही कधी प्रयत्न करणार आहोत. त्याला राष्ट्रीय दर्जा कधी देणार
आहोत. आमच्या कुशल वर्गाला आम्ही एम.आय.डी.सी. मध्ये कधी गाळा मिळवून देणार आहोत, यांचा व्यवसाय कधी सुरू करणार
आहोत. आज भटक्यांच्या प्रगतीसाठी कार्यशाळा भरण्याची
खूप नितांत गरज आहे. तो शिकला पाहिजे. मनुवादी व्यवस्थेने आम्हाला गावोगावी रामायण
सांगायला पाठवलेल आहे. आमच्या गीतेचा प्रचार करा. आमच्या देवा धर्माचा प्रचार करा,
ते घालतील त्या भिक्षेवर आम्ही जगायचं
आहे. भटक्यांना यातून पूर्णता बाहेर काढणं आवश्यक आहे.
त्यांचं पुनर्वसन करणे आवश्यक आहे. ज्यांचे पुनर्वसन झालेला आहे ते मात्र आज स्थिर
आहेत. मी बंजारा समाजातील आहे, बंजारा समाज सगळ्यात
जास्त वाढत आहे. लोक म्हणत आहेत की बंजारा समाजातील लोकांनी लीडरशिप करावी पण तसं
न करता प्रत्येक समाजाने आपले आपले प्रतिनिधी पुढे केले पाहिजेत.
भटक्या-विमुक्तांनी
एक मोठा आंदोलन उभे केले पाहिजे, आम्ही शेतीचे तुकडे
मागून घेतले पाहिजेत. बघा कोरोना सारखा महारोग आमच्या देशामध्ये पसरलेला आहे आणि
अशा परिस्थितीमध्ये सगळे कारखाने, व्यवसाय बंद आहेत, ज्यांच्याकडे
शेतीचे तुकडे आहेत ते नीट जगत आहेत. त्यांना ना कोरोनाची भीती आहे, ना त्यांना पोटापाण्याची भीती आहे. भटका समाज शिकला पाहिजे. वसंतराव
नाईकांची मेहरबानी त्यांनी येथे आश्रम शाळा उघडल्या आहेत. शैक्षणिक संस्था सुरू
झाल्या आहेत. आमचं काम आहे आम्ही आमची मुलं तिथं पाठवली पाहिजेत. आमचं काम आहे आम्ही त्यांना शेतीचे तुकडे मागितले पाहिजेत. गायरान जमिनी
आमच्या लोकांना दिल्यानंतर काढून घेतल्या खूप त्रास झाला.
आज
गरज आहे ती आम्ही सर्वांनी एकत्र येण्याची आणि
शेतीचे तुकडे मागून घेण्याची. जोपर्यंत आमचा समाज
स्थिर होणार नाही तोपर्यंत आम्ही एन.टी.आर. मध्ये सुद्धा, एन.सी.आर.
मध्ये सुद्धा, आणि सी. ए. ए.
मध्ये सुद्धा आम्ही भारतीय नागरिक होणार नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वात
मोठा नागरिकत्वाच्या दृष्टिकोनातून प्रश्न कोणाचा असेल
तर तो भटक्या विमुक्त समाजाचा आहे, कारण हा समाज गावोगाव भटकतो.
त्यांची मुलं कुठे जन्माला आले, माझा जन्म मला माहित नाही
कुठे झाला, तो तांड्यावर झाला
की रस्त्यावर झालेला आहे. परंतु शाळेत गेल्यानंतर कुठेतरी एक नाव टाकून दिल आहे. पण खरं सांगतो माझं जन्मस्थळ अजूनही माझ्या दाखल्यावर लिहिलेलं नाही,
माझ्या दाखल्यावर माझा धर्म लिहिलेला नाही. लोक म्हणत होते आम्ही
बंजारे आहोत म्हणून आम्ही बंजारे आहोत. इथून पुढे आम्ही आमची संस्कृती निर्माण
केली पाहिजे, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा स्वीकारण्यामागे
कारण हे आहे, फुले शाहू आंबेडकरी चळवळ फार मोठी आहे, ती बाबासाहेबांचे विचार मांडणारी चळवळ आहे. सविधान मानणारी चळवळ आहे आणि संविधानातूनच प्रत्येक माणसाचं भलं होणार
आहे...................................................
सूत्रसंचालक: राठोड
सर, आपण या चर्चेला पुढे कंटिन्यू करू, तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे. याच
माहितीला पुढे घेऊन जाण्यासाठी मी धनंजय झाकर्डे सरांना
प्रश्न करतो, पूर्ण भारतीय स्तरावर ओबीसी हा जो घटक आहे तो म्हणजे, जो भारतातील व्यक्ती शेड्युल
कास्ट नाहीये, शेडूल ट्राईब नाहीये आणि रिझर्व कॅटेगरी बाहेरील म्हणजे जसं
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाहीये तर हा उर्वरित जो समाज आहे तो आदर बॅकवॉर्ड समाज आहे. पूर्ण देशातला जो भटका विमुक्त समाज आहे याला जर कॉमन आयडेंटिटी अंतर्गत यायचं असेल आणि संविधानिक त्याची आयडेंटिटी आहे ते ओबीसी आहे. सामाजिक
दृष्टिकोनातून आपण जे प्रचार-प्रसार करत आहोत आणि सामाजिक सभ्यता स्थापन करणार
आहोत तर मग या समाजाचे आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी
तुम्हाला काय रोडमॅप सांगता येईल.
मा. धनंजय झाकार्डे: धन्यवाद विशाल, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला
आहे. येत्या काळामध्ये जेव्हा सभ्यतेच्या बाबतीत काही कार्यक्रम फिल्डमध्ये घेऊ
तेव्हा काही गोष्टी लक्षात येतीलच. जसं राठोड साहेबांनी सांगितलं तसं संघटित
करण्यासाठी काहीतरी सूत्र असावं लागतं. मी इतिहासात
जाऊन मध्ययुगात काळात येतो, जास्त वेळ नाही घेणार. थोडक्यात प्रयत्न करतो. जे लोक यज्ञ संस्कृतीला
विरोध करत होते त्या लोकांना राक्षस, असुर असं म्हटलं जात
होतं. इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा हेच लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी भांडत होते
तेव्हा त्यांना गुन्हेगार म्हटले गेलेल आहे. या लोकांना मात्र शिवाजी महाराजांनी
गुप्तहेराच काम दिलेला आहे. जे लोक बहुरूपी, वासुदेव, रामोशी आहेत या लोकांचा शिवाजी महाराजांनी
स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या बरोबर घेतलं आहे, म्हणजे
त्यांना त्यांनी त्यांच्या शासन-प्रशासनामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. जर या लोकांच्या क्षमतांना संधी दिली तर हे लोक काय करू शकतात हे आपण
शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहून शिकलं पाहिजे. या
वर्गाला सर्व महापुरुषांशी जोडल पाहिजे, कारण या वर्गाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखल गेल आहे.
मा. मदने साहेबांनी पण म्हटल आहे की तो वर्ग पशुपालक
आहे, किंवा वेगवेगळ्या वर्गात विभागला गेलेला आहे. मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये जे काम या समाजाच्या वाट्याला आले,
तेव्हा हि काम त्यांनी प्रामाणिकपणे केली. परंतु या कामामध्ये सुद्धा त्या त्या काळातल्या प्रशासनाकडून किंवा शासक
जमातिकडून अडथळे निर्माण करण्यात आले, म्हणून
इंग्रजांच्या काळात आपण पाहतो की सगळ्यात जास्त स्वातंत्र्यवीर कोण होते तर ते भटक्या विमुक्त समाजातील लोक होते. या लोकांनी
इंग्रजांना सुखाने जगू दिलं नाही आणि याचाच वचपा काढण्यासाठी इंग्रजांनी त्यांना
गुन्हेगार जमाती ठरवलं.
आज
पर्यंत हे लोक या गुन्हेगारीची समस्या भोगत आहेत. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या लोकांची वेगवेगळी कॅरेक्टरीस्टिक्स
आहेत आणि ह्यांचे कॅरेक्टरीस्टिक्स घेतली आणि मापदंड लावले तर ते मापदंड शेड्युल कास्ट, शेड्युल ट्रायब यांच्याशी मिळती जुळती आहेत,
काही लोक गावाच्या बाहेर राहत होते, कारागीर
लोक आहेत, पशुपालक आहेत तर यांना ओ.बी.सी. मापदंड लागतात. जसं बंजाराला महाराष्ट्र मध्ये भटके-विमुक्त म्हणतात पण आंध्र प्रदेशामध्ये आदिवासी म्हणतात. या लोकांची अश
छिन्नभिन्नता केलेली आहे, परंतु जेव्हा या लोकांचे पेहराव
असतील, भाषा असतील किंवा अनेक काही गोष्ट असतील त्यांच्याकडे
पाहिले तर त्यांच्यातील एकात्मता दिसून येते. मग ज्या
या सर्व गोष्टी दिसून येतात त्या आपण पकडल्या पाहिजे त्या अलगत समोर मांडल्या
पाहिजेत, आणि मग एकसूत्र पणे आपण त्यांना मूलनिवासी
बहुजन या आयडेंटिटी खाली एकत्र करू शकतो. आपण वर्गवारी
कमी केले पाहिजे आणि जातीव्यवस्थ कमी केले पाहिजे. अशा
प्रकारे त्यांना एकत्र करून आपल्या हक्कासाठी लढा उभारला पाहिजे, यासाठी लढले पाहिजे, हे सांगितलं पाहिजे,
आणि याच गोष्टी फुलेंनी शाहूंनी बाबासाहेबांनी आणि शिवाजी
महाराजांनी सांगितलेल्या आहेत व त्यांच्या कृतीतून दाखवलेल्या आहेत. सर्व एकच आहोत हे जोपर्यंत आपण त्यांना पटवून सांगत नाही, त्यांच्यामध्ये पेरत नाही, तोपर्यंत आम्हाला
त्यांना एका सूत्रात बांधता येणार नाही. या सर्वांनी हे
समजलं पाहिजे की आम्ही या देशाचे मूलनिवासी आहोत आणि मूलनिवासी असल्यामुळेच वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो. स्वातंत्र्यासाठी लढलो म्हणूनच आम्हाला कधी राक्षस, असुर, गुन्हेगार म्हटलं गेलं. क्रांतिसिंह नाना पाटलांनी जेव्हा प्रतिसरकार स्थापन केलं तेव्हा या
प्रतिसरकार मध्ये लोकांनीही दरोडे टाकले आहेत, चोऱ्या केल्या आहेत मग ते जर स्वातंत्र्यसैनिक होऊ शकतात तर मग या लोकांनी
त्यांना हक्क मिळवण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी,
हे सर्व केले तर हे स्वातंत्र्यसैनिक का होऊ शकत नाहीत.
सूत्रसंचालक: मा.
झाकार्डे सर, तुम्ही येथे वर्गीकरण कमी करून एकत्रीकरण करणे
गरजेचे आहे हा एक महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे. देशामध्ये वर्गीकरण जास्तीत
जास्त करा असा संदेश आपला शत्रू पक्ष समाजामध्ये पसरवत आहे
परंतु आपल्याला समाजामध्ये एकत्र करण्याची मानसिकता निर्माण करायची आहे. मा. मदने
सरांना मी प्रश्न विचारू इच्छितो की, जसं गांधीजींची एक
विचारधारा आहे, त्यांची विचारधारा अशी आहे की, ज्या जातीत जो
माणूस जन्माला आला आहे, आणि तो दहावी झालेला आहे किंवा
त्याने चांगलं शिक्षण घेतलेला आहे. आता त्या व्यक्तीने
काय करायचं तर तो ज्या समाजात जन्माला आलेला आहे त्या समाजाचे जे काम आहे तेच काम तू कर, अशा प्रकारची एक
विचारधारा आहे त्याला गांधीवादी विचारधारा असे म्हणतात. आणि दुसरी एक गोळवळकरवादी विचारधारा आहे, जी
अशी आहे की ज्या जातीत जन्माला आला आणि ज्या जातीचे जे कार्य
आहे तेच कार्य त्या समाजाने करत राहावे, म्हणजेच स्टेटस्को
वाली एक विचारधारा आहे. जशा परिस्थिती मध्ये तुम्ही आहात त्याच परिस्थितीमध्ये
राहा, या अपरिवर्तनीय विचारधारा
आहेत याउलट या देशांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरवादी अशी एक विचारधारा आहे की जी क्रांतिकारी विचारधारा आहे. फुले यांची विचारधारा असे सांगते की आमचा जो
समाज आहे, जो पर्यंत सत्याचा
शोध घेणार नाही, त्याच्या समस्या कशा निर्माण झाल्या,
त्या समस्येची कारण काय आहेत, या समस्या कशा सोडवाव्यात हे जोपर्यंत तो शोधणार
नाही, तसेच बाबासाहेबांची समतेची विचारधारा जो पर्यंत तो समजणार नाही तोपर्यंत तो आपले संविधानिक अधिकार
काय आहेत हे समजू शकणार नाही. तर मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की गांधी, गोळकरवादी विचारधारेने भटक्या-विमुक्तांची प्रगती होऊ शकते का? कि फुले-शाहू-आंबेडकरवादी विचाराने भटक्यांचे
प्रगती होऊ शकते आणि संविधानिक अधिकार प्राप्त होऊ शकतात या अनुषंगाने आपण आपल्या
दर्शकांना माहिती द्यावी.
मा. उत्तम मदने: खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्तांची
परिस्थिती सुधरावयाची असेल
तर भटक्या-विमुक्तांना फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारे शिवाय दुसरा पर्यायच नाही. आंबेडकरी
विचारधारा घेऊनच भटके-विमुक्त त्यांची परिस्थिती सुधारू शकतात,
कारण जर आपण गांधी विचारधारा पाहायला गेलो किंवा गोळवळकर विचारधारा
पाहायला गेलो, तर
या विचारधारेमध्ये व्यक्तीची आयडेंटिटी पहा किंवा डिग्निटी पहा,
मग ती व्यवसायाच्या अनुषंगाने असेल किंवा जातीच्या
अनुषंगाने असेल या सर्वांमध्ये एक व्यक्ती म्हणून किंवा ह्युमन बीइंग म्हणून सर्व मानवी
मूल्यांच हनन होत आहे. आणि
त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने आपल्याला
फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारा घेऊन जाते, ती आपल्याला आपल्या हक्काचे भाषा शिकवते,
आपल्या कर्तव्याची भाषा शिकवते,
आपल्याला समतावादी, समानतावादी ची भाषा शिकवते. तर या सर्व गोष्टी
भटक्या-विमुक्त समाजाने आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. कारण की भटके-विमुक्त म्हणून
काही भटके काही राज्यांमध्ये शेड्युल कास्ट मध्ये असतील शेडूल ट्राईब मध्ये असतील
आणि महाराष्ट्रात तर यांची सेपरेट कॅटेगरीज आहे. आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड मिळालेले आहेत तर या मिळालेल्या सेफगार्ड चा जास्तीत जास्त फायदा घेऊन जास्तीत जास्त समाजाला
शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे आणि जेव्हा हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात
येईल आणि शिकल्यानंतर आपण ज्या परिस्थितीत जगत आहोत, आपल्यावर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहेत, हे विदारक चित्र जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा हा
समाज पेटून उठणार आहे. या समाजातुन लोक शिकलेले नाहीत असं झालेलं नाही, या समाजातून काही थोड्याफार प्रमाणात लोक शिकलेले आहेत. बाबासाहेबांनी एक संकल्पना राबवली होती ती म्हणजे PAY BACK to SOCIETY. डॉ. बाबासाहेबांच्या या पे बॅक टू सोसायटी या संकल्पनेला
अनुसरून या समाजातून जे जे लोक शिकलेले आहेत त्यांनी आपल्या पाठीमागील समाज
जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात कसा येईल, त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल,
कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील,
गाव पातळीवर, तालुका पातळीवर, व जिल्हा पातळीवर आपल्याला कोणत्या Strategy
बांधाव्या लागतील, तसेच फुले-आंबेडकरी विचारधारा भटक्यांच्या पाला वरती,
तांड्यावर पोचवण्यासाठी आपल्याला कोणत्या Strategy आखाव्या लागतील याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
खूपसाऱ्या संघटना आहेत, त्या काम करत आहेत परंतु खूप सार्या संघटना ह्या जातीपुरत्या मर्यादित आहेत.
आणि त्या त्यांच्या जातीसाठी काम करत आहेत. आपल्याला कल्लेक्टीव काम करायचं
म्हटलं,
समायोजनाच्या भूमिकेतून काम करायचं म्हटलं तर आपल्याला या
वेगवेगळ्या संघटनांचं एकत्रीकरण करणे गरजेचे आहे. हे एकत्रीकरण करून आपल्याला या संघटनांना हेही सांगणे महत्वाच
आहे की फुले-शाहू-आंबेडकरी विचार भटक्यांची परिस्थिती बदलण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत.
गावोगावी जे युवक वर्ग आहे, त्यांना एकत्रित आणणे, त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग देणे, मग या ट्रेनिंग मध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात पण मी
म्हणेल की भटक्या-विमुक्तांना जर कोणत ट्रेनिंग द्यायचं असेल तर ते पहिल्यांदा संविधानिक ट्रेनिंग त्यांना एकदा कळू
द्यात,
आपले हक्क काय आहेत, ते आपण कसे मिळवू शकतो, हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हक्क
मिळवल्यानंतर आणि आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही या
सर्व गोष्टी भटक्यांच्या पाला पर्यंत, तांडा पर्यंत पोहोचन खूप गरजेच आहे. त्यासाठी युथ कॅडर बिल्डिंग होणं खूप गरजेचं
आहे. युवकांना त्या पद्धतीने मार्गदर्शन होणे आणि मिळणे गरजेचे
आहे. एकंदरीतच
सर्व संस्था-संघटनांनी कलेकटीव विचार करणं खूप गरजेचं आहे. (भाग-३ वाचा)
No comments:
Post a Comment
Please give your valuable comment on the write-up and Share it on Whatsapp, Facebook, Twitter, etc. / कृपया लेखनावर आपली मौल्यवान टिप्पणी द्या आणि व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी वर शेर करा.