सूत्रसंचालक: मा. मदने सर, आपण येथे
योग्य मार्गदर्शन केलेले आहे. आपल्या मार्गदर्शनातून दिसत आहे की जो युवक वर्ग आहे त्याला विचारधारेची पारख करण्यासाठी
प्रशिक्षण देणे गरजेचे आहे हाच आपला संदेश आहे असं मला दिसते. इथे मी डॉक्टर माने
सरांना पुढचा प्रश्न विचारू इच्छितो, जसं गांधीवादी, गोळवळकर वादी विचारधारा बाहेरून दिसताना
आपल्याला वेगवेगळ्या दिसतात, असं वाटतं की गांधीवादी
विचारधारा वेगळी आहे आणि गोळवळकर वादी विचारधारा वेगळी आहे, परंतु
त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशाच या दोन बाजूचे
प्रवाह राजनीतीमध्ये पण आहेत, आणि आमच्या भटक्या विमुक्त
समाजाचा जो युवावर्ग आहे तर ह्या युवा वर्गाचा वापर हे राजनीतीमध्ये कसा करतात आणि
त्याच्या पासून जर समाजाला बाहेर काढायच असेल तर त्यांनी मग फुले शाहू आंबेडकरवादी विचारांकडे गेले पाहिजे याबद्दल आपण मार्गदर्शन
करावे.
डॉ. विजय माने: सर,
एकदम बरोबर बोललात, आपल्याला कोणताही
प्रश्न असेल किंवा कोणतीही समस्या असेल तर ते संविधानामुळे सुटणार आहे. कारण
संविधानामध्ये समानता आहे आणि आपले हक्क आहेत. आपल्याला आयुष्यात वैज्ञानिक
दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे, आणि आपला भटका समाज
हा पूर्णतः अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांच्यात अडकलेला आहे.
यापुढे जाऊन मी असं सांगेन जर आपल्याला आपला नेता निवडायचा असेल तर तो नेता आपल्या
समाजासाठी किती सॅक्रिफाइस करेल, एखादा नेता हा जाती पुरताच
मर्यादित राहतो, एखाद्या जातीतून एखादा नेता येतो आणि पक्ष
त्याला पुढे उचलतात. तो नेता त्या जाती पुरताच मर्यादित
राहतो. ओबीसी जातीच्या खूप सार्या संघटना आहेत, त्या सर्व
संघटनांनी एकत्र येऊन व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. आपण खूप वर्षापासून पाहत
आहे की एखादा पक्ष हा एखाद्या जातीच्या समूहाला वापरून घेत असतो, तसेच एकदा का आपले काम झाले की तो पक्ष त्या
जातीच्या नेत्याला आणि जातीला कसं बाहेर टाकतो हे आपल्याला उदाहरणासहित माहित आहे.
सूत्रसंचालक: डॉ.
विजय माने सिरांनी जी मांडणी केलेली आहे कि आमच्या समाजाचे जे लोक आहेत ते जातीजातीमध्ये विखुरलेले आहेत, तसेच प्रत्येक जातीचा कोणता ना कोणता राजनीतिक पक्ष वापर करतो, आणि त्याचा वापर
झाल्यानंतर त्याला फेकून देतो, याला आपण म्हणतो युज आणि थ्रू strategy
आहे. आमच्या समाजाला फेकून दिल्यानंतर
त्याला कळतं की आमचा वापर झालेला आहे, परंतु त्याला वापरल
जात असतं, तेव्हा तो अभिमान बाळगत असतो की बघा मी कसा काय
पुढे आहे. हि जी भावना आहे
ती आमच्या समाजाला लक्षात घ्यावी लागेल, आमचं संघटन जरी छोट असेल, घर छोट असेल, तरी दुसऱ्यांच्या काचेच्या महालात जाऊन आमचा उद्धार होणार नाही. सर,
आपणही सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपला धन्यवाद. मी मा. उल्हास
राठोड सरांकडे येतो, सर, ओबीसी
समाजाचे जसे प्रश्न आहेत की त्यांची जातिगत जनगणना झाली पाहिजे, ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळाले
पाहिजे. तर हा जो प्रतिनिधित्वाचा मामला आहे तो एक गहन मामला आहे, आणि हा सोडवण्यासाठी जो भटके-विमुक्त समाजामध्ये इंटेलेक्चुअल फोरम आहे
मंग या इंटेलेक्चुअल समुदायाने वरच्या समूहाशी समायोजन
करण्यासाठी काय करावे लागेल, आणि त्याच बरोबर ब्राह्मणी वर्ण
व्यवस्थेतील भटका विमुक्त हा भागच नाही आहे, आणि या समूहाच
आत्ता ब्राह्मणीकरण करण्याचं काम सुरू आहे तर यातील नेमकी सभ्यता कोणती?
मा. उल्हास राठोड: खरंतर जनगणना होन सर्व समाजाच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी भागीदारी म्हणतात ते खर आहे, म्हणून तर सत्यशोधक ओबीसी परिषद गेले वीस पंचवीस वर्ष सर्व जातींची जनगणना करण्याचे आंदोलन चालवलेल होतं. इथली जी शासन व्यवस्था
आहे आणि ती मनुवाद्यांच्या हातामध्ये असल्यामुळे, मंडल
आयोगापासून आम्हाला 27 टक्क्यांवर ठेवलेला आहे हे
आपल्या सर्वांना विधीत आहे. अस आहे की, आमचे ओबीसी, भटक्या विमुक्तांसह सर्वच जेव्हा मंडल आयोग चालू होतं, तेव्हा फक्त मूठभर लोक आंदोलन करत होते, प्रकाश
आंबेडकर, श्रावण देवरे, जनार्दन पाटील
ही काही मंडळी होती, आम्ही त्यावेळी आंदोलन करत होतो आणि
आमचा ओबीसी समाज राम मंदिर बांधण्यासाठी आयोध्याला गेलेला होता. तो सर्व काही
गमावून बसला. जनगणना सर्वांचीच झाली पाहिजे, पण मुद्दा असा
आहे की ह्या विचारांपर्यंत तो कसा येणार, माझी अस्मिता
काय आहे, माझे संविधानिक अधिकार काय आहेत, आणि ते मला कसे मिळवता येतील. संविधान खरंच माझ्यासाठी राष्ट्रीय ग्रंथ
आहे का, माझ्या कल्याणाचा ग्रंथ आहे का, याची ओळख सुद्धा
आमच्या वर्गाला नसल्यामुळे हि आमची दुरावस्था झालेली आहे. आताशी आम्हाला संविधान
कळायला लागलेलं आहे, पण संविधानातील विचार माझ्या
कल्याणासाठी आहेत ते कळत नाहीये याचं कारण आहे सांस्कृतिक बदल. मनुवादी विचारसरणी
आहे आणि संविधानिक विचारसरणी आहे यामध्ये ची फारकत आहे या फारकती मुळे या दोन्ही
विचारांचा मेळ होत नाही, म्हणून आमचा ओबीसी किंवा भटका
विमुक्त संविधान मान्य करत नाही. ते मान्य करण्यासाठी आमचं ओबीसी म्हणून विमुक्त
म्हणून किंवा भटके म्हणून सांस्कृतिक परिवर्तन होणे गरजेचे आहे, आमच्या तांडा, पालावर जाऊन संविधान नुसतं वाचलं तर
कळणार नाही, त्याचे तत्व सांगावे लागेल, ती तत्व तुमच्या संस्कृतीशी साधर्म्य आहेत ते सांगावं लागेल.
उदाहरणासाठी
सांगतो,
बंजारा समाजाची संस्कृती काय आहे, पारधी
समाजाची संस्कृती काय आहे. हि मनुवादी संस्कृती नाही आहे. हि आर्यांची संस्कृती
नाही, ही ब्राह्मणी संस्कृती नाही, माझ्या
बंजारा समाजामध्ये आणि विमुक्त मध्ये रामोशी म्हणा, पारधी
म्हणा, त्यामध्ये दैववाद हा मूळ त्याच्या समाजामधला नाही
आहे. बंजारा समाज कधीही दैववादी नाही, तो ईश्वरी पूजा करणारा
नाही, तो लिंबाच्या झाडाखाली वर्षातून किंवा काही वर्षातून
एकदाच पूजा करतो आणि ती पूजा हि देवाची, मूर्तीची नाही करत,
तर तो जमिनीची पूजा करतो, मातीची पूजा करतो,
वृक्षाची पूजा करतो, म्हणजे तो निसर्गाची पूजा
करतो. हा समाज निसर्गपूजक आहे. निसर्गाने मला जीवन दिल आहे, म्हणून
मी निसर्गाची राखण केले पाहिजे या विचाराचा आहे, आणि बुद्धांचे विचार यापेक्षा काय
वेगळं होते. ज्या मातीने तुला जन्म दिला आहे, त्या मातीची राखण केली पाहिजे,
ज्या पाण्यावर तू जीवन जगतो ते पाणी शुद्ध ठेवण्याच तुझं कर्तव्य
आहे, हे जे विचार आहेत ते बंजारा समाजाच्या संस्कृतीशी
जुळतात, म्हणून तर हा समाज निसर्गाच्या सानिध्यात राहिला,
तो गावगाड्यात, वर्णव्यवस्थेत कधी घुसला नाही.
हा समाज इथल्या कुठल्याच गोष्टीला धक्का न लागता, तुमच्या
गावगाड्यात काय चालत त्याला धक्का न लागता ह्या सर्व गोष्टींपासून एकदम अलिप्त
राहिलेला समाज आहे. या समाजाला जर आता मेन स्ट्रीम
मध्ये आणायचं असेल, मूळ व्यवस्थेशी
जर जोडायचं असेल तर येथील मूळ विचारसरणी कोणती आहे. दोन विचारसरणी आहेत, ब्राह्मणी आणि अब्राहमणी. आम्हाला कोणती
विचारसरणी जवळची वाटते, कोणाशी मैत्री केली पाहिजे, आम्ही या अब्राह्मणी विचारसरणी म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारधारा.
फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हणजे काय, आंबेडकर म्हणजे काय,
समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व हे विचार आम्ही शिकलो पाहिजे. पारधी
आणि बंजारा मध्ये बंधुत्वाच नात जुळल पाहिजे, त्यांची मुलगी मी केले पाहिजे हे बंधुत्वाच
नात आहे. या सांस्कृतिक परिवर्तनासाठी हनुमंत उपरे काका
मला म्हणायचे, पोरा संविधान म्हणजे काय, संविधान फक्त वाचल म्हणजे संविधान समजलं असं नाही, जर हे संविधान समजलं तर मग तुमचे भटके अजून पर्यंत उपरे का राहिले? ते पूर्णपणे आंबेडकरवाद जगले, आंबेडकर
वाद म्हणजे काय समता, बंधुता, न्याय,
आणि बुध्द्धीजम शिवाय आंबेडकर वाद पूर्ण
होत नाही मित्रांनो.
सूत्रसंचालक:
राठोड साहेब, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या
टप्प्याकडे आहोत आणि आपण खूप सुंदर माहिती दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये हेच म्हणतात की, संविधानामध्ये मी जे तत्त्व
घेतले आहेत ती समता, स्वातंत्र्य, बंधुता,
न्याय, हि फ्रेंच
राज्यक्रांतीतून घेतलेले नसून, ती मी माझे गुरू तथागत
गौतम बुद्ध यांच्या विचारातूनच घेतलेले आहेत. जी व्यक्ती
बुध्द्धांच्या जीवनशैली ने वागतो तो व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता
या तत्वाने वागतो, शाहू फुले आंबेडकरवादी, बौद्धवादी, कबीरवादी रविदासवादी आहे असे आपण समजावे.
कार्यक्रमाच्या शेवटच्या संदेशवादी गोष्टींमध्ये आपल्याला एकच मिनिट बोलायच आहे,
आपल्याकडे तीन मिनिट आहेत. मा. झाकार्डे
साहेब आजच्या कार्यक्रमाचा जो संदेश आहे की फुले शाहू आंबेडकरवादी विचारच भटक्या-विमुक्तांना
संविधानिक हक्क आणि अधिकार देऊ शकतात यामध्ये आपण त्याला समअप करावे.
मा. धनंजय झाकर्डे: सर्वप्रथम मी राठोड साहेबांना विनंती करेन, सर्वांना
विनंती करेन, संस्कृती हा शब्द आम्ही टाळला पाहिजे.
आमची कोणतीही संस्कृती नाही, आमची सभ्यता आहे आणि बंजारा
समाजामध्ये संस्कृतीला धाटी म्हणतात, ऍक्च्युली ती आमची धाटी आहे आणि इथून पुढे
आम्ही सभ्यता म्हणायला शिकलं पाहिजे. दुसरा महत्वाचा संदेश म्हणजे असा आहे, या भटक्या विमुक्त समाजातील युवकांना टार्गेट केलं पाहिजे, आणि त्यांना पकडून या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत, ही जबाबदारी जेवढी फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेतील लोकांची आहे तेवढीच
जबाबदारी शिकल्या सवरलेल्या सर्व लोकांची आहे. ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी
कळलेल्या आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या
पाहिजेत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही अब्राह्मणी
शब्द सुद्धा टाळला पाहिजे, येथून पुढे आम्ही गैरआंबेडकरवादी
म्हटलं पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर वाद आमचा प्रधान आहे, इतरांना
आम्ही गैर-आंबेडकरवादी म्हटलं पाहिजे किंवा गैर-मूलनिवासी म्हटलं पाहिजे. 1931 ला
आमची जनगणना गैर हिंदू म्हणून झालेले होती म्हणून आम्ही मूलनिवासी आहोत, आता इतरांना आम्ही गैर मूलनिवासी म्हटलं पाहिजे आणि आम्ही आमची ओळख
मूळनिवासी म्हणून प्रस्थापित केली पाहिजे, त्यासाठी झटले
पाहिजे, आणि त्यासाठी प्रबोधन केलं पाहिजे एवढेच मला
म्हणायचे आहे. धन्यवाद.
सूत्रसंचालक: सर
आपण एकाच मिनिटांमध्ये जबरदस्त अहावान समाजाला केल आहे. मी मा. मदने सरांना विचारू इच्छितो की,
आपलं भटक्या विमुक्त समाजाला काय आहवान राहील, जेणेकरून जे
युवक वर्ग आहे किंवा जे शिक्षण घेणारा वर्ग आहे यांना एकत्र करून संघटन करून
त्यांना मोठ्या संघटनेचे कसं जोडता येईल. कारण छोट्या छोट्या संघटनेमध्ये त्यांची
प्रगती होणार नाही तर त्यांना मोठ्या संघटनशी कसं जोडता येईल.
मा. उत्तम मदने: बरोबर आहे, या समुदायांची परिस्थिती सुधारवयाची असेल तर आपल्याला सर्वप्रथम भटक्या-विमुक्तांन मधील
जो युवक वर्ग आहे ह्या युवक वर्गाला पकडण्याची गरज आहे,
कारण जेव्हा युवक वर्गाला आपण छोट्या छोट्या संघटनेमध्ये बांधून
त्यांना मोठ्या संघटनेचे जोडून घेऊ तेव्हा मोठ्या संघटनेकडून यांना एक perspective
मिळू शकतो. गाव पातळीवर, तालुका पातळीवर,
किंवा जिल्हा पातळीवर ज्या संघटना आहेत त्या संघटनांची बांधणी
करण्यासाठी आपल्याला एक सिस्टिम उभी करावी लागेल. आणि हि सिस्टीम कोण उभी करू शकते तर आपण जे सर्व
आंबेडकरवादी आहोत किंवा भटक्या विमुक्त जातीतील जो शिकलेला
वर्ग आहे या सर्वांनी यासाठी पुढाकार घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे. हे काम करायला सुरुवात केल्यानंतर हे अशक्य आहे असं नाही, वेळ लागेल पण एक दिवस हे नक्कीच शक्य होईल, फुले
शाहू आंबेडकरवादी विचारधारा भटक्यांच्या तांड्याव, पालावर पोहोचलेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद.
सूत्रसंचालक: धन्यवाद
मदने सर, आपण मोलाचा संदेश दिला, मी पुढे डॉ. विजय माने सर यांच्याकडे येऊ इच्छितो, आपल्याला जी जातीची ओळख दिलेली आहे ती जातीची ओळख आपल्या शत्रूने दिलेली
आहे आणि हि जातीची दिलेली ओळख गौरवास्पद नाही, तर आपली जी मूळ ओळख आहे मूळनिवासी म्हणून ही मूळनिवासी म्हणून ओळख घेऊन
समाजात वावरण्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता.
डॉ. विजय माने: जात कोणाला सांगू वाटत नाही, मी जरी असलो तरी माझी
जात मला सांगून वाटत नाही. कारण यातून न्यूनगंड येतो आणि याचा परिणाम पुढच्या
व्यक्तीवर पडतच असतो, इथे मी एकच सांगेन, आपल्याला आपला इतिहास म्हणून आपल्याला सर्वच माहिती आहे, इथून पुढे आपल्या जातीतील आपल्याला जो नेता निवडायचा आहे तो आपल्या समाजासाठी
किती साक्रीफाय करू शकतो हे पाहणे गरजेचे आहे, त्याच्या पुढे
जाऊ आपल्याला संघटना बांधण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील यावर विचार
करणे खूप गरजेचे आहे.
सूत्रसंचालक: राठोड
सरांना पण संदेशपर मेसेज मध्ये हेच विचारीन कि, आपल्या संघटनेचे नाव सत्यशोधक ओबीसी परिषद आहे, जो
आपला भटका विमुक्त समाज आहे या समाजाला सत्यशोधकी विचार, समतासैनिक, आणि कॅडर बिल्डिंग किंवा कार्यकर्ता निर्माण करण्याच्या प्रोसेस मध्ये
आणण्यासाठी व्यापक संघटनेमध्ये कसं जोडता येईल.
मा. उल्हास राठोड: सत्यशोधक चळवळ मध्ये मी खूप वर्षापासून कार्यरत
आहे, त्यापूर्वी प्रा. मोतीराज
राठोड यांनी स्थापन केलेल्या 'भारतीय आदिवासी भटके-विमुक्त
युथ फ्रंट' या संघटने मध्ये मी कित्येक वर्ष मुंबई आणि मुंबई
प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहे, भटक्या विमुक्तांच्या
कामासाठी मी प्रा. मोतीराज
राठोड आणि अन्य मंडळींबरोबर देशभर फिरलो आहे. भारतभर
फिरून 191 जातींचा शोध घेतलेला आहे, त्यामुळे मला साधारण
यांच्या सभ्येतेची ओळख आहे. सर्व भटक्यांची सभ्यता काय
असली पाहिजे, त्यांचा कॉमन धागा
काय आहे तो आम्ही शोधला पाहिजे.
भटक्या-विमुक्तांच्या शेकडो संघटना आहेत, मी आज एवढंच सांगेन
की ज्या सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे एखादं फेडरेशन करूयात, आणि त्यामध्ये समान मूल्य काय आहेत ते शोधून काढून आपलं मूल्य काय आहे तर फुले शाहू आंबेडकरी विचारधारा त्यामध्ये पेरली पाहिजे.
सूत्रसंचालक: धन्यवाद सर, इथेच
सर्वांचेच एकमत दिसत आहे, म्हणजे आमची कार्यपद्धती
वेगळी आहे, किंवा आम्ही जे विषय हाताळत आहोत ते थोडे थोडे
वेगळे आहेत, म्हणून काय आम्ही वेगळे नाहीत आमचा सर्वांचा
उद्देश एकच आहे. या देशांमध्ये जी विषमतावादी
व्यवस्था आहे त्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून एक क्रांती घडवून
आणणे. देशांमध्ये समतावादी व्यवस्था आणणे, त्यासाठी
आम्ही आमच्या वेगवेगळ्या संघटना मध्ये काम करत आहोत,
त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे हा संदेश आपल्या सर्वच
वक्त्यांनी येथे दिलेला आहे. आपले सर्व वक्ते या परीचर्चेमध्ये आले, त्यामुळे आम्ही MNT New Network चायनल
आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.
