About me

Sunday, 19 July 2020

“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - ३)

सूत्रसंचालक:  मा. मदने सर, आपण येथे योग्य मार्गदर्शन केलेले आहे. आपल्या मार्गदर्शनातून दिसत आहे की जो युवक वर्ग आहे त्याला विचारधारेची पारख करण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे हाच आपला संदेश आहे असं मला दिसते. इथे मी डॉक्टर माने सरांना पुढचा प्रश्न विचारू इच्छितो, जसं गांधीवादीगोळवळकर वादी विचारधारा बाहेरून दिसताना आपल्याला वेगवेगळ्या दिसतात, असं वाटतं की गांधीवादी विचारधारा वेगळी आहे आणि गोळवळकर वादी विचारधारा वेगळी आहे, परंतु त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशाच या दोन बाजूचे प्रवाह राजनीतीमध्ये पण आहेत, आणि आमच्या भटक्या विमुक्त समाजाचा जो युवावर्ग आहे तर ह्या युवा वर्गाचा वापर हे राजनीतीमध्ये कसा करतात आणि त्याच्या पासून जर समाजाला बाहेर काढायच असेल तर त्यांनी मग फुले शाहू आंबेडकरवादी विचारांकडे गेले पाहिजे याबद्दल आपण मार्गदर्शन करावे. 

डॉ. विजय माने: सर, एकदम बरोबर बोललातआपल्याला कोणताही प्रश्न असेल किंवा कोणतीही समस्या असेल तर ते संविधानामुळे सुटणार आहे. कारण संविधानामध्ये समानता आहे आणि आपले हक्क आहेत. आपल्याला आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहेआणि आपला भटका समाज हा पूर्णतः अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांच्यात अडकलेला आहे. यापुढे जाऊन मी असं सांगेन जर आपल्याला आपला नेता निवडायचा असेल तर तो नेता आपल्या समाजासाठी किती सॅक्रिफाइस करेल, एखादा नेता हा जाती पुरताच मर्यादित राहतो, एखाद्या जातीतून एखादा नेता येतो आणि पक्ष त्याला पुढे उचलतात. तो नेता त्या जाती पुरताच मर्यादित राहतो. ओबीसी जातीच्या खूप सार्‍या संघटना आहेत, त्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. आपण खूप वर्षापासून पाहत आहे की एखादा पक्ष हा एखाद्या जातीच्या समूहाला वापरून घेत असतो, तसेच एकदा का आपले काम झाले की तो पक्ष त्या जातीच्या नेत्याला आणि जातीला कसं बाहेर टाकतो हे आपल्याला उदाहरणासहित माहित आहे. 

सूत्रसंचालक:  डॉ. विजय माने सिरांनी जी मांडणी केलेली आहे कि आमच्या समाजाचे जे लोक आहेत ते जातीजातीमध्ये विखुरलेले आहेत, तसेच प्रत्येक जातीचा कोणता ना कोणता राजनीतिक पक्ष वापर करतो, आणि त्याचा वापर झाल्यानंतर त्याला फेकून देतो, याला आपण म्हणतो युज आणि थ्रू strategy आहे. आमच्या समाजाला फेकून दिल्यानंतर त्याला कळतं की आमचा वापर झालेला आहे, परंतु त्याला वापरल जात असतं, तेव्हा तो अभिमान बाळगत असतो की बघा मी कसा काय पुढे आहे. हि जी भावना आहे ती आमच्या समाजाला लक्षात घ्यावी लागेल, आमचं संघटन जरी छोट असेलघर छोट असेल, तरी दुसऱ्यांच्या काचेच्या महालात जाऊन आमचा उद्धार होणार नाही. सर, आपणही सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपला धन्यवाद. मी मा. उल्हास राठोड सरांकडे येतो, सरओबीसी समाजाचे जसे प्रश्न आहेत की त्यांची जातिगत जनगणना झाली पाहिजे, ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. तर हा जो प्रतिनिधित्वाचा मामला आहे तो एक गहन मामला आहे, आणि हा सोडवण्यासाठी जो भटके-विमुक्त समाजामध्ये इंटेलेक्चुअल फोरम आहे मंग या इंटेलेक्चुअल समुदायाने वरच्या समूहाशी समायोजन करण्यासाठी काय करावे लागेल, आणि त्याच बरोबर ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेतील भटका विमुक्त हा भागच नाही आहे, आणि या समूहाच आत्ता ब्राह्मणीकरण करण्याचं काम सुरू आहे तर यातील नेमकी सभ्यता कोणती

मा. उल्हास राठोड: खरंतर जनगणना होन सर्व समाजाच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी भागीदारी म्हणतात ते खर आहे, म्हणून तर सत्यशोधक ओबीसी परिषद गेले वीस पंचवीस वर्ष सर्व जातींची जनगणना करण्याचे आंदोलन चालवलेल होतं. इथली जी शासन व्यवस्था आहे आणि ती मनुवाद्यांच्या हातामध्ये असल्यामुळे, मंडल आयोगापासून आम्हाला 27 टक्क्यांवर ठेवलेला आहे हे आपल्या सर्वांना विधीत आहे. अस आहे की, आमचे ओबीसी, भटक्या विमुक्तांसह सर्वच जेव्हा मंडल आयोग चालू होतं, तेव्हा फक्त मूठभर लोक आंदोलन करत होते, प्रकाश आंबेडकर, श्रावण देवरे, जनार्दन पाटील ही काही मंडळी होती, आम्ही त्यावेळी आंदोलन करत होतो आणि आमचा ओबीसी समाज राम मंदिर बांधण्यासाठी आयोध्याला गेलेला होता. तो सर्व काही गमावून बसला. जनगणना सर्वांचीच झाली पाहिजे, पण मुद्दा असा आहे की ह्या विचारांपर्यंत तो कसा येणारमाझी अस्मिता काय आहे, माझे संविधानिक अधिकार काय आहेत, आणि ते मला कसे मिळवता येतील. संविधान खरंच माझ्यासाठी राष्ट्रीय ग्रंथ आहे का, माझ्या कल्याणाचा ग्रंथ आहे का, याची ओळख सुद्धा आमच्या वर्गाला नसल्यामुळे हि आमची दुरावस्था झालेली आहे. आताशी आम्हाला संविधान कळायला लागलेलं आहे, पण संविधानातील विचार माझ्या कल्याणासाठी आहेत ते कळत नाहीये याचं कारण आहे सांस्कृतिक बदल. मनुवादी विचारसरणी आहे आणि संविधानिक विचारसरणी आहे यामध्ये ची फारकत आहे या फारकती मुळे या दोन्ही विचारांचा मेळ होत नाही, म्हणून आमचा ओबीसी किंवा भटका विमुक्त संविधान मान्य करत नाही. ते मान्य करण्यासाठी आमचं ओबीसी म्हणून विमुक्त म्हणून किंवा भटके म्हणून सांस्कृतिक परिवर्तन होणे गरजेचे आहे, आमच्या तांडा, पालावर जाऊन संविधान नुसतं वाचलं तर कळणार नाही, त्याचे तत्व सांगावे लागेल, ती तत्व तुमच्या संस्कृतीशी साधर्म्य आहेत ते सांगावं लागेल. 

उदाहरणासाठी सांगतो, बंजारा समाजाची संस्कृती काय आहे, पारधी समाजाची संस्कृती काय आहे. हि मनुवादी संस्कृती नाही आहे. हि आर्यांची संस्कृती नाही, ही ब्राह्मणी संस्कृती नाही, माझ्या बंजारा समाजामध्ये आणि विमुक्त मध्ये रामोशी म्हणा, पारधी म्हणा, त्यामध्ये दैववाद हा मूळ त्याच्या समाजामधला नाही आहे. बंजारा समाज कधीही दैववादी नाही, तो ईश्वरी पूजा करणारा नाही, तो लिंबाच्या झाडाखाली वर्षातून किंवा काही वर्षातून एकदाच पूजा करतो आणि ती पूजा हि देवाची, मूर्तीची नाही करत, तर तो जमिनीची पूजा करतो, मातीची पूजा करतो, वृक्षाची पूजा करतो, म्हणजे तो निसर्गाची पूजा करतो. हा समाज निसर्गपूजक आहे. निसर्गाने मला जीवन दिल आहे, म्हणून मी निसर्गाची राखण केले पाहिजे या विचाराचा आहे, आणि बुद्धांचे विचार यापेक्षा काय वेगळं होते. ज्या मातीने तुला जन्म दिला आहे, त्या मातीची राखण केली पाहिजे, ज्या पाण्यावर तू जीवन जगतो ते पाणी शुद्ध ठेवण्याच तुझं कर्तव्य आहे, हे जे विचार आहेत ते बंजारा समाजाच्या संस्कृतीशी जुळतात, म्हणून तर हा समाज निसर्गाच्या सानिध्यात राहिला, तो गावगाड्यात, वर्णव्यवस्थेत कधी घुसला नाही. हा समाज इथल्या कुठल्याच गोष्टीला धक्का न लागता, तुमच्या गावगाड्यात काय चालत त्याला धक्का न लागता ह्या सर्व गोष्टींपासून एकदम अलिप्त राहिलेला समाज आहे. या समाजाला जर आता मेन स्ट्रीम मध्ये आणायचं असेलमूळ व्यवस्थेशी जर जोडायचं असेल तर येथील मूळ विचारसरणी कोणती आहे. दोन विचारसरणी आहेत, ब्राह्मणी आणि अब्राहमणी. आम्हाला कोणती विचारसरणी जवळची वाटते, कोणाशी मैत्री केली पाहिजे, आम्ही या अब्राह्मणी विचारसरणी म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारधारा.  फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हणजे काय, आंबेडकर म्हणजे काय, समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व हे विचार आम्ही शिकलो पाहिजे. पारधी आणि बंजारा मध्ये बंधुत्वाच नात जुळल पाहिजे, त्यांची मुलगी मी केले पाहिजे हे बंधुत्वाच नात आहे. या सांस्कृतिक परिवर्तनासाठी हनुमंत उपरे काका मला म्हणायचे, पोरा संविधान म्हणजे काय, संविधान फक्त वाचल म्हणजे संविधान समजलं असं नाहीजर हे संविधान समजलं तर मग तुमचे भटके अजून पर्यंत उपरे का राहिले? ते पूर्णपणे आंबेडकरवाद जगले, आंबेडकर वाद म्हणजे काय समता, बंधुता, न्याय, आणि बुध्द्धीजम शिवाय आंबेडकर वाद पूर्ण होत नाही मित्रांनो. 

सूत्रसंचालक: राठोड साहेब, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत आणि आपण खूप सुंदर माहिती दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये हेच म्हणतात की, संविधानामध्ये मी जे तत्त्व घेतले आहेत ती समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, हि फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेले नसून, ती मी माझे गुरू तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारातूनच घेतलेले आहेत. जी व्यक्ती बुध्द्धांच्या जीवनशैली ने वागतो तो व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाने वागतो, शाहू फुले आंबेडकरवादी, बौद्धवादी, कबीरवादी रविदासवादी आहे असे आपण समजावे. कार्यक्रमाच्या शेवटच्या संदेशवादी गोष्टींमध्ये आपल्याला एकच मिनिट बोलायच आहे, आपल्याकडे तीन मिनिट आहेत.  मा. झाकार्डे साहेब आजच्या कार्यक्रमाचा जो संदेश आहे की फुले शाहू आंबेडकरवादी विचारच भटक्या-विमुक्तांना संविधानिक हक्क आणि अधिकार देऊ शकतात यामध्ये आपण त्याला समअप करावे. 

मा. धनंजय झाकर्डे: सर्वप्रथम मी राठोड साहेबांना विनंती करेन, सर्वांना विनंती करेनसंस्कृती हा शब्द आम्ही टाळला पाहिजे. आमची कोणतीही संस्कृती नाही, आमची सभ्यता आहे आणि बंजारा समाजामध्ये संस्कृतीला धाटी म्हणतात, ऍक्च्युली ती आमची धाटी आहे आणि इथून पुढे आम्ही सभ्यता म्हणायला शिकलं पाहिजे. दुसरा महत्वाचा संदेश म्हणजे असा आहेया भटक्या विमुक्त समाजातील युवकांना टार्गेट केलं पाहिजे, आणि त्यांना पकडून या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेतही जबाबदारी जेवढी फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेतील लोकांची आहे तेवढीच जबाबदारी शिकल्या सवरलेल्या सर्व लोकांची आहे. ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी कळलेल्या आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही अब्राह्मणी शब्द सुद्धा टाळला पाहिजेयेथून पुढे आम्ही गैरआंबेडकरवादी म्हटलं पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर वाद आमचा प्रधान आहे, इतरांना आम्ही गैर-आंबेडकरवादी म्हटलं पाहिजे किंवा गैर-मूलनिवासी म्हटलं पाहिजे. 1931 ला आमची जनगणना गैर हिंदू म्हणून झालेले होती म्हणून आम्ही मूलनिवासी आहोत, आता इतरांना आम्ही गैर मूलनिवासी म्हटलं पाहिजे आणि आम्ही आमची ओळख मूळनिवासी म्हणून प्रस्थापित केली पाहिजे, त्यासाठी झटले पाहिजे, आणि त्यासाठी प्रबोधन केलं पाहिजे एवढेच मला म्हणायचे आहे. धन्यवाद.

सूत्रसंचालक: सर आपण एकाच मिनिटांमध्ये जबरदस्त अहावान समाजाला केल आहे. मी मा. मदने सरांना विचारू इच्छितो की, आपलं भटक्या विमुक्त समाजाला काय आहवान राहील, जेणेकरून जे युवक वर्ग आहे किंवा जे शिक्षण घेणारा वर्ग आहे यांना एकत्र करून संघटन करून त्यांना मोठ्या संघटनेचे कसं जोडता येईल. कारण छोट्या छोट्या संघटनेमध्ये त्यांची प्रगती होणार नाही तर त्यांना मोठ्या संघटनशी कसं जोडता येईल. 

मा. उत्तम मदने: बरोबर आहेया समुदायांची परिस्थिती सुधारवयाची असेल तर आपल्याला सर्वप्रथम भटक्या-विमुक्तांन मधील जो युवक वर्ग आहे ह्या युवक वर्गाला पकडण्याची गरज आहे, कारण जेव्हा युवक वर्गाला आपण छोट्या छोट्या संघटनेमध्ये बांधून त्यांना मोठ्या संघटनेचे जोडून घेऊ तेव्हा मोठ्या संघटनेकडून यांना एक perspective मिळू शकतो. गाव पातळीवर, तालुका पातळीवर, किंवा जिल्हा पातळीवर ज्या संघटना आहेत त्या संघटनांची बांधणी करण्यासाठी आपल्याला एक सिस्टिम उभी करावी लागेल. आणि हि सिस्टीम कोण उभी करू शकते तर आपण जे सर्व आंबेडकरवादी आहोत किंवा भटक्‍या विमुक्‍त जातीतील जो शिकलेला वर्ग आहे या सर्वांनी यासाठी पुढाकार घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे. हे काम करायला सुरुवात केल्यानंतर हे अशक्य आहे असं नाही, वेळ लागेल पण एक दिवस हे नक्कीच शक्य होईल, फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा भटक्यांच्या तांड्यावपालावर पोहोचलेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद. 

सूत्रसंचालक: धन्यवाद मदने सर, आपण मोलाचा संदेश दिलामी पुढे डॉ. विजय माने सर यांच्याकडे येऊ इच्छितोआपल्याला जी जातीची ओळख दिलेली आहे ती जातीची ओळख आपल्या शत्रूने दिलेली आहे आणि हि जातीची दिलेली ओळख गौरवास्पद नाही, तर आपली जी मूळ ओळख आहे मूळनिवासी म्हणून ही मूळनिवासी म्हणून ओळख घेऊन समाजात वावरण्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता. 

डॉ. विजय माने: जात कोणाला सांगू वाटत नाही, मी जरी असलो तरी माझी जात मला सांगून वाटत नाही. कारण यातून न्यूनगंड येतो आणि याचा परिणाम पुढच्या व्यक्तीवर पडतच असतो, इथे मी एकच सांगेन, आपल्याला आपला इतिहास म्हणून आपल्याला सर्वच माहिती आहे, इथून पुढे आपल्या जातीतील आपल्याला जो नेता निवडायचा आहे तो आपल्या समाजासाठी किती साक्रीफाय करू शकतो हे पाहणे गरजेचे आहे, त्याच्या पुढे जाऊ आपल्याला संघटना बांधण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील यावर विचार करणे खूप गरजेचे आहे. 

सूत्रसंचालक: राठोड सरांना पण संदेशपर मेसेज मध्ये हेच विचारीन किआपल्या संघटनेचे नाव सत्यशोधक ओबीसी परिषद आहे, जो आपला भटका विमुक्त समाज आहे या समाजाला सत्यशोधकी विचार, समतासैनिक,  आणि कॅडर बिल्डिंग किंवा कार्यकर्ता निर्माण करण्याच्या प्रोसेस मध्ये आणण्यासाठी व्यापक संघटनेमध्ये कसं जोडता येईल. 

मा. उल्हास राठोड: सत्यशोधक चळवळ मध्ये मी खूप वर्षापासून कार्यरत आहे, त्यापूर्वी प्रा. मोतीराज राठोड यांनी स्थापन केलेल्या 'भारतीय आदिवासी भटके-विमुक्त युथ फ्रंट' या संघटने मध्ये मी कित्येक वर्ष मुंबई आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहे, भटक्या विमुक्तांच्या कामासाठी मी प्रा. मोतीराज राठोड आणि अन्य मंडळींबरोबर देशभर फिरलो आहे. भारतभर फिरून 191 जातींचा शोध घेतलेला आहे, त्यामुळे मला साधारण यांच्या सभ्येतेची ओळख आहे. सर्व भटक्यांची सभ्यता काय असली पाहिजे, त्यांचा कॉमन धागा काय आहे  तो आम्ही शोधला पाहिजे. भटक्या-विमुक्तांच्या शेकडो संघटना आहेत, मी आज एवढंच सांगेन की ज्या सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे एखादं फेडरेशन करूयात, आणि त्यामध्ये समान मूल्य काय आहेत ते शोधून काढून आपलं मूल्य काय आहे तर फुले शाहू आंबेडकरी विचारधारा त्यामध्ये पेरली पाहिजे. 

सूत्रसंचालक: धन्यवाद सरइथेच सर्वांचेच एकमत दिसत आहेम्हणजे आमची कार्यपद्धती वेगळी आहे, किंवा आम्ही जे विषय हाताळत आहोत ते थोडे थोडे वेगळे आहेत, म्हणून काय आम्ही वेगळे नाहीत आमचा सर्वांचा उद्देश एकच आहे. या देशांमध्ये जी विषमतावादी व्यवस्था आहे त्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून एक क्रांती घडवून आणणे. देशांमध्ये समतावादी व्यवस्था आणणेत्यासाठी आम्ही आमच्या वेगवेगळ्या संघटना मध्ये काम करत आहोत, त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे हा संदेश आपल्या सर्वच वक्त्यांनी येथे दिलेला आहे. आपले सर्व वक्ते या परीचर्चेमध्ये आलेत्यामुळे आम्ही MNT New Network चायनल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - १)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - २)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - ३)




“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - २)

सूत्रसंचालक : हो सर, तुम्हाला तोच प्रश्न आहे की आज तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेऊन पुण्यामध्ये एक नामांकित डॉक्टर आहात आपल्याला हा जो समाज आहे तर या समाजामध्ये किती मुलं शालेय शिक्षण घेऊ शकतात आणि हे शिक्षण घेण्यासाठी भटक्या-विमुक्तांच्या मुलांना काय समस्या येतात हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल. 

डॉ. विजय माने: जसं मी म्हटलं कीकागदपत्रांशिवाय मुलांना ओळख नसते आणि त्यांना शाळेत पण जाता येणार नाही. शाळेत न गेल्यामुळे मुलं वंचित राहू शकतात आणि आपण जे म्हणतो उच्च-शिक्षण, उच्च शिक्षणासाठी आज काल पाहिल तर खूप कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येकाला जावं लागणार आहेपण सगळ्याच मुलांना मेडिकल मिळेल किंवा इंजिनिअरिंग मिळेल हे शक्य नाही. मग आपण त्यातून काय करू शकतो. गव्हर्मेंट सगळ्यांना जॉब देऊ शकत नाही तर आपण इतर काय उपाययोजना करू शकतो याबद्दल विचार करावा असं मला वाटतं. 

सूत्रसंचालक: धन्यवाद सर, मी आता पुढील चौथे पॅनलिस्ट आहे, ते राठोड सर, हे ह्या विषयातील अभ्यासक आहेत, आपल्याला प्रश्न विचारताना मी माहिती सांगू इच्शछितो, कि महाराष्ट्रमध्ये जो धोबी/ परीट समाज आहे. व इतर प्रांतांमध्ये बिहार असेलमध्यप्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल येथील धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये येतो. परंतु महाराष्ट्रात आल्यानंतर हे ओबीसी मध्ये येतात. आणि त्याच्यामुळे भारतातील इतर भागातील धोबी समाज आणि महाराष्ट्रातील समाज एकत्रित येत नाही किंवा इथला धोबी समाज इतर राज्यातील समाजा बरोबर एकत्रीकरण करत नाहीअशीच परिस्थिती आपल्याला भटके-विमुक्त समाजामध्ये सुद्धा दिसते, तर हा एवढ्या मोठ्या प्रमाणात विघटित झालेला जो भटके विमुक्सत समाज आहे या समाजाला संघटित करण्यासाठी कोणत्या मुद्द्यांवर आपण त्यांना संघटित करू शकतो यावर मार्गदर्शन करावे.  

मा. उल्हास राठोड: जय भीम, संघटित करण्याच एक सूत्र असायला पाहिजेहे काम तुमच्या-आमच्यापैकी जे चळवळीचे लोक आहोत, विद्वान माणसे आहोत यांनी हे केलं पाहिजे. जसे आपण या पॅनलवर इतके लोक आहेत हे त्याचं काम आहे. भटक्या विमुक्तांची चळवळ गेले पन्नास वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे. 1871 पासून ही मंडळी सर्व गुन्हेगार म्हणून जेलमध्ये होते.  1952 मध्ये खरं स्वातंत्र्य या लोकांना मिळालेलं आहे, त्यामुळे संविधान कसं झालंभारताला स्वातंत्र्य कसे मिळाल, याची काही माहिती या समाजाला नव्हती. यामध्ये विशेष करून पहिल्या ज्या 14 जाती आहेत त्यांना आपण विमुक्त म्हणतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस कायदेमंत्री होते. भारत स्वतंत्र होऊनही हा समाज अजून जेलमध्ये आहे आणि या समाजाला बाहेर काढायल पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिफारस केली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर मध्ये येऊन तारेची कुंपण तोडली आणि समाजाला बाहेर काढलं. त्यांनी त्या त्या राज्याच्या सरकारला आदेश दिले होते की या लोकांना एससी-एसटी मध्ये घाला आणि त्यांचे संविधानिक अधिकार मजबूत करा.  परंतु असं झालं की इतक्या वर्षानंतरही भटका विमुक्त समाज अजून स्वातंत्र्याची पोळी खाऊ शकत नाहीतो स्वतंत्र जीवन जगू शकत नाही, या देशातला भटका विमुक्त समाज या देशाचे नागरिकत्व सुद्धा पत्करू शकत नाही. यामध्ये एकता राहिलेले नाही. त्यांच्याकडे नागरिकत्वाच काहीतरी कागदपत्र हव आहे, त्यावेळेस वसाहतीतून बाहेर पडले तेव्हा त्यांना कोणताही दाखला दिला गेला नाहीजर त्यावेळेस ते सर्टिफिकेट दिल असतं तर कमीतकमी हे भारताचे नागरिक आहेत हे तरी लोकांना कळलं असतं. भटक्या विमुक्त समाजाला जे प्रतिनिधी हवे होते ते प्रतिनिधी सुद्धा आतच असल्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाच कोणीच प्रतिनिधित्व करू शकलं नाही.  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर कोणतरी होते आणि त्यांनी संविधान लिहिले यांची ओळखही त्या लोकांना वसाहतींमध्ये नव्हती. पण भटक्या-विमुक्तांनी हे समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी आम्हाला इंग्रजांनी डांबून ठेवलेल्या या वसाहती मधून बाहेर काढण्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला होता. संविधानामध्ये आजही आम्हाला सर्व हक्क प्राप्त होऊ शकतात परंतु प्रश्न आहे की आंबेडकरी विचारधारा जोपर्यंत आम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत संविधानिक हक्कापर्यंत जाता येणार नाही. आतापर्यंत सर्व वक्त्यांनी सांगितलं आहे कि आमची अवस्था ना घर का ना घाट का अशी आहेआमच्यामध्ये एक वाक्यता नाही. 

आमच्या भटक्यांची अवस्था काय आहे, आमचा भटका काय करतो, सकाळी चार वाजता डुकऱ्या वाजवतो, पाच वाजता मसनजोगी येतो, सहा वाजता कोणी येतो, सात वाजता आमचा बहुरूपी येतो अशा प्रकारे दिवसभर 24 तास भटक्यांचे एक वेळापत्रक बनलेल आहे. रात्री दोन वाजता आमचा पारधी येऊन हल्ला करून डाका मारून तो शेवटचा झोपतो.  सकाळ-दुपार-संध्याकाळ सगळ्यांना वाटण्या करुन दिलेल्या आहेत.  हे इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेली आमची परिस्थिती आहे. या व्यवस्थेतून जर बाहेर पडायचं असेल तर या पारंपारिक व्यवसायांना लाथाडलं पाहिजे. आता आम्ही संविधानिक राज्यामध्ये राहतो, आता आम्हाला कोठेही नोकरी करण्याचा हक्क आहे. आम्हाला वाटेल तसा आमचा व्यवसाय सुरू करण्याचा अधिकार आहे. आमच्या मध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक कुशल गट आहे आणि एक अकुशल गट आहे. आमच्या मध्ये जे लोक कुशल आहेत ते घिसाडी आहेत, काही अवजारे बनवणारे, काही लोक आमच्या नावावर करोडो रुपये कमवून त्यांची तिजोरी भरत आहेत. आमची कला आम्हाला जोपासण्यासाठी आम्ही कधी प्रयत्न करणार आहोत. त्याला राष्ट्रीय दर्जा कधी देणार आहोत. आमच्या कुशल वर्गाला आम्ही एम.आय.डी.सी. मध्ये कधी गाळा मिळवून देणार आहोत, यांचा व्यवसाय कधी सुरू करणार आहोत. आज भटक्यांच्या प्रगतीसाठी कार्यशाळा भरण्याची खूप नितांत गरज आहे. तो शिकला पाहिजे. मनुवादी व्यवस्थेने आम्हाला गावोगावी रामायण सांगायला पाठवलेल आहे. आमच्या गीतेचा प्रचार करा. आमच्या देवा धर्माचा प्रचार करा, ते घालतील त्या भिक्षेवर आम्ही जगायचं आहे. भटक्यांना यातून पूर्णता बाहेर काढणं आवश्यक आहे. त्यांचं पुनर्वसन करणे आवश्यक आहे. ज्यांचे पुनर्वसन झालेला आहे ते मात्र आज स्थिर आहेत. मी बंजारा समाजातील आहेबंजारा समाज सगळ्यात जास्त वाढत आहे. लोक म्हणत आहेत की बंजारा समाजातील लोकांनी लीडरशिप करावी पण तसं न करता प्रत्येक समाजाने आपले आपले प्रतिनिधी पुढे केले पाहिजेत. 

भटक्या-विमुक्तांनी एक मोठा आंदोलन उभे केले पाहिजे, आम्ही शेतीचे तुकडे मागून घेतले पाहिजेत. बघा कोरोना सारखा महारोग आमच्या देशामध्ये पसरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे कारखाने, व्यवसाय बंद आहेत, ज्यांच्याकडे शेतीचे तुकडे आहेत ते नीट जगत आहेत. त्यांना ना कोरोनाची भीती आहेना त्यांना पोटापाण्याची भीती आहे. भटका समाज शिकला पाहिजे. वसंतराव नाईकांची मेहरबानी त्यांनी येथे आश्रम शाळा उघडल्या आहेत. शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत. आमचं काम आहे आम्ही आमची मुलं तिथं पाठवली पाहिजेत. आमचं काम आहे आम्ही त्यांना शेतीचे तुकडे मागितले पाहिजेत. गायरान जमिनी आमच्या लोकांना दिल्यानंतर काढून घेतल्या खूप त्रास झाला.  

आज गरज आहे ती आम्ही सर्वांनी एकत्र येण्याची आणि शेतीचे तुकडे मागून घेण्याची.  जोपर्यंत आमचा समाज स्थिर होणार नाही तोपर्यंत आम्ही एन.टी.आर. मध्ये सुद्धा, एन.सी.आर. मध्ये सुद्धा, आणि सी. ए. ए. मध्ये सुद्धा आम्ही भारतीय नागरिक होणार नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वात मोठा नागरिकत्वाच्या दृष्टिकोनातून प्रश्न कोणाचा असेल तर तो भटक्या विमुक्त समाजाचा आहे, कारण हा समाज गावोगाव भटकतो. त्यांची मुलं कुठे जन्माला आले, माझा जन्म मला माहित नाही कुठे झालातो तांड्यावर झाला की रस्त्यावर झालेला आहे. परंतु शाळेत गेल्यानंतर कुठेतरी एक नाव टाकून दिल आहे. पण खरं सांगतो माझं जन्मस्थळ अजूनही माझ्या दाखल्यावर लिहिलेलं नाही, माझ्या दाखल्यावर माझा धर्म लिहिलेला नाही. लोक म्हणत होते आम्ही बंजारे आहोत म्हणून आम्ही बंजारे आहोत. इथून पुढे आम्ही आमची संस्कृती निर्माण केली पाहिजेफुले शाहू आंबेडकरी विचारधारा स्वीकारण्यामागे कारण हे आहे, फुले शाहू आंबेडकरी चळवळ फार मोठी आहेती बाबासाहेबांचे विचार मांडणारी चळवळ आहे. सविधान मानणारी चळवळ आहे आणि संविधानातूनच प्रत्येक माणसाचं भलं होणार आहे................................................... 

सूत्रसंचालक: राठोड सर, आपण या चर्चेला पुढे कंटिन्यू करूतुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे. याच माहितीला पुढे घेऊन जाण्यासाठी मी धनंजय झाकर्डे  सरांना प्रश्न करतो, पूर्ण भारतीय स्तरावर ओबीसी हा जो घटक आहे तो म्हणजे,  जो भारतातील व्यक्ती शेड्युल कास्ट नाहीये, शेडूल ट्राईब नाहीये आणि रिझर्व कॅटेगरी बाहेरील म्हणजे जसं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाहीये तर हा उर्वरित जो समाज आहे तो आदर बॅकवॉर्ड समाज आहे.  पूर्ण देशातला जो भटका विमुक्त समाज आहे याला जर कॉमन आयडेंटिटी अंतर्गत यायचं असेल आणि संविधानिक त्याची आयडेंटिटी आहे ते ओबीसी आहे. सामाजिक दृष्टिकोनातून आपण जे प्रचार-प्रसार करत आहोत आणि सामाजिक सभ्यता स्थापन करणार आहोत तर मग या समाजाचे आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय रोडमॅप सांगता येईल. 

मा. धनंजय झाकार्डे: धन्यवाद विशाल, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. येत्या काळामध्ये जेव्हा सभ्यतेच्या बाबतीत काही कार्यक्रम फिल्डमध्ये घेऊ तेव्हा काही गोष्टी लक्षात येतीलच. जसं राठोड साहेबांनी सांगितलं तसं संघटित करण्यासाठी काहीतरी सूत्र असावं लागतं. मी इतिहासात जाऊन मध्ययुगात काळात येतो, जास्त वेळ नाही घेणार. थोडक्यात प्रयत्न करतो. जे लोक यज्ञ संस्कृतीला विरोध करत होते त्या लोकांना राक्षस, असुर असं म्हटलं जात होतं. इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा हेच लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी भांडत होते तेव्हा त्यांना गुन्हेगार म्हटले गेलेल आहे. या लोकांना मात्र शिवाजी महाराजांनी गुप्तहेराच काम दिलेला आहे. जे लोक बहुरूपी, वासुदेव, रामोशी आहेत या लोकांचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या बरोबर घेतलं आहे, म्हणजे त्यांना त्यांनी त्यांच्या शासन-प्रशासनामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. जर या लोकांच्या क्षमतांना संधी दिली तर हे लोक काय करू शकतात हे आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहून शिकलं पाहिजे. या वर्गाला सर्व महापुरुषांशी जोडल पाहिजे, कारण या वर्गाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखल गेल आहे. मा. मदने साहेबांनी पण म्हटल आहे की तो वर्ग पशुपालक आहे, किंवा वेगवेगळ्या वर्गात विभागला गेलेला आहे. मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये जे काम या समाजाच्या वाट्याला आले, तेव्हा हि काम त्यांनी प्रामाणिकपणे केली. परंतु या कामामध्ये सुद्धा त्या त्या काळातल्या प्रशासनाकडून किंवा शासक जमातिकडून अडथळे निर्माण करण्यात आलेम्हणून इंग्रजांच्या काळात आपण पाहतो की सगळ्यात जास्त स्वातंत्र्यवीर कोण होते तर ते भटक्या विमुक्त समाजातील लोक होते. या लोकांनी इंग्रजांना सुखाने जगू दिलं नाही आणि याचाच वचपा काढण्यासाठी इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार जमाती ठरवलं. 

आज पर्यंत हे लोक या गुन्हेगारीची समस्या भोगत आहेत. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या लोकांची वेगवेगळी कॅरेक्टरीस्टिक्स आहेत आणि ह्यांचे कॅरेक्टरीस्टिक्स   घेतली आणि मापदंड लावले तर ते मापदंड शेड्युल कास्ट, शेड्युल ट्रायब यांच्याशी मिळती जुळती आहेत, काही लोक गावाच्या बाहेर राहत होते, कारागीर लोक आहेत, पशुपालक आहेत तर यांना ओ.बी.सी. मापदंड लागतात. जसं बंजाराला महाराष्ट्र मध्ये भटके-विमुक्त म्हणतात पण आंध्र प्रदेशामध्ये आदिवासी म्हणतात. या लोकांची अश छिन्नभिन्नता केलेली आहे, परंतु जेव्हा या लोकांचे पेहराव असतील, भाषा असतील किंवा अनेक काही गोष्ट असतील त्यांच्याकडे पाहिले तर त्यांच्यातील एकात्मता दिसून येते. मग ज्या या सर्व गोष्टी दिसून येतात त्या आपण पकडल्या पाहिजे त्या अलगत समोर मांडल्या पाहिजेतआणि मग एकसूत्र पणे आपण त्यांना मूलनिवासी बहुजन या आयडेंटिटी खाली एकत्र करू शकतो. आपण वर्गवारी कमी केले पाहिजे आणि जातीव्यवस्थ कमी केले पाहिजे. अशा प्रकारे त्यांना एकत्र करून आपल्या हक्कासाठी लढा उभारला पाहिजे, यासाठी लढले पाहिजेहे सांगितलं पाहिजे, आणि याच गोष्टी फुलेंनी शाहूंनी बाबासाहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या आहेत व त्यांच्या कृतीतून दाखवलेल्या आहेत. सर्व एकच आहोत हे जोपर्यंत आपण त्यांना पटवून सांगत नाहीत्यांच्यामध्ये पेरत नाही, तोपर्यंत आम्हाला त्यांना एका सूत्रात बांधता येणार नाही. या सर्वांनी हे समजलं पाहिजे की आम्ही या देशाचे मूलनिवासी आहोत आणि मूलनिवासी असल्यामुळेच वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो. स्वातंत्र्यासाठी  लढलो म्हणूनच आम्हाला कधी राक्षस, असुर, गुन्हेगार म्हटलं गेलं. क्रांतिसिंह नाना पाटलांनी जेव्हा प्रतिसरकार स्थापन केलं तेव्हा या प्रतिसरकार मध्ये लोकांनीही दरोडे टाकले आहेत, चोऱ्या केल्या आहेत मग ते जर स्वातंत्र्यसैनिक होऊ शकतात तर मग या लोकांनी त्यांना हक्क मिळवण्यासाठीस्वतःचं संरक्षण करण्यासाठी, हे सर्व केले तर हे स्वातंत्र्यसैनिक का होऊ शकत नाहीत. 

सूत्रसंचालक:  मा. झाकार्डे सर, तुम्ही येथे वर्गीकरण कमी करून एकत्रीकरण करणे गरजेचे आहे हा एक महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे. देशामध्ये वर्गीकरण जास्तीत जास्त करा असा संदेश आपला शत्रू पक्ष समाजामध्ये पसरवत आहे परंतु आपल्याला समाजामध्ये एकत्र करण्याची मानसिकता निर्माण करायची आहे. मा. मदने सरांना मी प्रश्न विचारू इच्छितो की, जसं गांधीजींची एक विचारधारा आहे, त्यांची विचारधारा अशी आहे की, ज्या जातीत जो माणूस जन्माला आला आहेआणि तो दहावी झालेला आहे किंवा त्याने चांगलं शिक्षण घेतलेला आहे. आता त्या व्यक्तीने काय करायचं तर तो ज्या समाजात जन्माला आलेला आहे त्या समाजाचे जे काम आहे तेच काम तू कर, अशा प्रकारची एक विचारधारा आहे त्याला गांधीवादी विचारधारा असे म्हणतात. आणि दुसरी एक गोळवळकरवादी विचारधारा आहेजी अशी आहे की ज्या जातीत जन्माला आला आणि ज्या जातीचे जे कार्य आहे तेच कार्य त्या समाजाने करत राहावे, म्हणजेच स्टेटस्को वाली एक विचारधारा आहे. जशा परिस्थिती मध्ये तुम्ही आहात त्याच परिस्थितीमध्ये राहा, या अपरिवर्तनीय विचारधारा आहेत याउलट या देशांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरवादी अशी एक विचारधारा आहे की जी क्रांतिकारी विचारधारा आहे. फुले यांची विचारधारा असे सांगते की आमचा जो समाज आहेजो पर्यंत सत्याचा शोध घेणार नाही, त्याच्या समस्या कशा निर्माण झाल्या, त्या समस्येची कारण काय आहेत, या समस्या कशा सोडवाव्यात हे जोपर्यंत तो शोधणार नाही, तसेच बाबासाहेबांची समतेची विचारधारा जो पर्यंत तो समजणार नाही तोपर्यंत तो आपले संविधानिक अधिकार काय आहेत हे समजू शकणार नाही. तर मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की गांधीगोळकरवादी विचारधारेने भटक्या-विमुक्तांची प्रगती होऊ शकते का? कि फुले-शाहू-आंबेडकरवादी विचाराने भटक्यांचे प्रगती होऊ शकते आणि संविधानिक अधिकार प्राप्त होऊ शकतात या अनुषंगाने आपण आपल्या दर्शकांना माहिती द्यावी. 

मा. उत्तम मदने:  खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्तांची परिस्थिती सुधरावयाची असेल तर भटक्या-विमुक्तांना फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारे शिवाय  दुसरा पर्यायच नाही.  आंबेडकरी विचारधारा घेऊनच भटके-विमुक्त त्यांची परिस्थिती सुधारू शकतात, कारण जर आपण गांधी विचारधारा पाहायला गेलो किंवा गोळवळकर विचारधारा पाहायला गेलो, तर या विचारधारेमध्ये व्यक्तीची आयडेंटिटी पहा किंवा डिग्निटी पहा, मग ती व्यवसायाच्या अनुषंगाने असेल किंवा जातीच्या अनुषंगाने असेल या सर्वांमध्ये एक व्यक्ती म्हणून किंवा ह्युमन बीइंग म्हणून सर्व मानवी मूल्यांच हनन होत आहे. आणि त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने आपल्याला फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारा घेऊन जाते, ती आपल्याला आपल्या हक्काचे भाषा शिकवते, आपल्या कर्तव्याची भाषा शिकवते, आपल्याला समतावादी, समानतावादी ची भाषा शिकवते. तर या सर्व गोष्टी भटक्या-विमुक्त समाजाने आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. कारण की भटके-विमुक्त म्हणून काही भटके काही राज्यांमध्ये शेड्युल कास्ट मध्ये असतील शेडूल ट्राईब मध्ये असतील आणि महाराष्ट्रात तर यांची सेपरेट कॅटेगरीज आहे. आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड मिळालेले आहेत तर या मिळालेल्या सेफगार्ड चा जास्तीत जास्त फायदा घेऊन जास्तीत जास्त समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे आणि जेव्हा हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात येईल आणि शिकल्यानंतर आपण ज्या परिस्थितीत जगत आहोत, आपल्यावर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहेतहे विदारक चित्र जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा हा समाज पेटून उठणार आहे. या समाजातुन लोक शिकलेले नाहीत असं झालेलं नाहीया समाजातून काही थोड्याफार प्रमाणात लोक शिकलेले आहेत. बाबासाहेबांनी एक संकल्पना राबवली होती ती म्हणजे PAY BACK to SOCIETY.  डॉ. बाबासाहेबांच्या या पे बॅक टू सोसायटी या संकल्पनेला अनुसरून या समाजातून जे जे लोक शिकलेले आहेत त्यांनी आपल्या पाठीमागील समाज जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात कसा येईल, त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, गाव पातळीवर, तालुका पातळीवर, व जिल्हा पातळीवर आपल्याला कोणत्या Strategy बांधाव्या लागतील, तसेच फुले-आंबेडकरी विचारधारा भटक्यांच्या पाला वरती, तांड्यावर पोचवण्यासाठी आपल्याला कोणत्या Strategy आखाव्या लागतील याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. खूपसाऱ्या संघटना आहेत, त्या काम करत आहेत परंतु खूप सार्‍या संघटना ह्या जातीपुरत्या मर्यादित आहेत. आणि त्या त्यांच्या जातीसाठी काम करत आहेत. आपल्याला कल्लेक्टीव काम करायचं म्हटलं, समायोजनाच्या भूमिकेतून काम करायचं म्हटलं तर आपल्याला या वेगवेगळ्या संघटनांचं एकत्रीकरण करणे गरजेचे आहे. हे एकत्रीकरण करून आपल्याला या संघटनांना हेही सांगणे महत्वाच आहे की फुले-शाहू-आंबेडकरी विचार भटक्यांची परिस्थिती बदलण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. गावोगावी जे युवक वर्ग आहे, त्यांना एकत्रित आणणे, त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग देणेमग या ट्रेनिंग मध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात पण मी म्हणेल की भटक्या-विमुक्तांना जर कोणत ट्रेनिंग द्यायचं असेल तर ते पहिल्यांदा संविधानिक ट्रेनिंग त्यांना एकदा कळू द्यात, आपले हक्क काय आहेत, ते आपण कसे मिळवू शकतोहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हक्क मिळवल्यानंतर आणि आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही या सर्व गोष्टी भटक्यांच्या पाला पर्यंततांडा पर्यंत पोहोचन खूप गरजेच आहे. त्यासाठी युथ कॅडर बिल्डिंग होणं खूप गरजेचं आहे. युवकांना त्या पद्धतीने मार्गदर्शन होणे आणि मिळणे गरजेचे आहे. एकंदरीतच सर्व संस्था-संघटनांनी कलेकटीव विचार करणं खूप गरजेचं आहे. (भाग-३ वाचा)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - १)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - २)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - ३)




“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - १)

“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” या विषयावर एम. एन. टी. न्यूज नेटवर्क या यूट्यूब चैनल वर दिनांक 14/07/2020 रोजी परिचर्चा आयोजित केलेली होती या परीचर्चेचे TRANSCRIPTION इथे दिलेले आहे

(हि एकच परिचर्चा TRANSCRIPTION करून ब्लॉग वरती तीन भागात विभागून दिलेली आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी).


Nomadic and De-notified Tribes - Constitutional Rights

सूत्रसंचालक (मा. विशाल गाईकवाड): सर्वांना जय भीम, जय मूलनिवासी. आपल्या सर्वांचे एम.एन.टी. न्यूज नेटवर्क या यूट्यूब चैनल आणि फेसबुक पेज वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोतकि जो भारतातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज आपण घेतलेला विषय आहे, “फुले-आंबेडकरी विचारानेच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार मिळू शकतात”. हा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय आपण येथे परीचर्चेसाठी घेतलेला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासकांना आणि विचारवंतांना बोलावलेल आहे, आपण सर्वप्रथम त्यांचे स्वागत करूयात आणि एकेकाची ओळख करून घेऊयात. सर्वप्रथम आहेत ते, मा. उत्तम मदनेत्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून संशोधनाचं काम केलेल आहे, शिक्षण घेत आहेत, त्यांनी परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण व संशोधनाचे कार्य केल आहे, तसेच ते  भटक्या विमुक्त समाजावर अभ्यास करत आहेत. सर तुमचं स्वागत आहे. 

आमचे दुसरे पॅनलिस्ट आहेत डॉ. विजय माने, डॉ. विजय माने सर हे भटके-विमुक्त समाजाचे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ते पुणे येथे वास्तव्यास आहेत, खूप संघर्षातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेल आहे आणि आपल्या समाजासाठी ते झटत आहेत. येथे एम. एम. टी. न्यूज नेटवर्क चैनल वरती त्यांच वक्ता म्हणून स्वागत करतो. 

त्याचबरोबर आमचे तिसरे पॅनलिस्ट आहेत ते म्हणजे, मा. धनंजय झाकर्डे साहेब, धनंजय झाकर्डे सरांचा सुद्धा भटक्या-विमुक्त समाजाच्या चालीरीती संदर्भात दांडगा अभ्यास आहे. त्याचबरोबर ते मूलनिवासी सभ्यता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

आमचे चौथे पॅनलिस्ट आहेत ते आपणा सर्वांचे परिचित असणारे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेते व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. उल्हास राठोड साहेब, त्यांचेही मी स्वागत करतो, उल्हास राठोड साहेब हे मुंबई येथील ओबीसी सत्यशोधक परिषदेचे सदस्य आहेत, भटके-विमुक्त इंटलेक्च्युअल फोरमचे महत्त्वपूर्ण अभ्यासक आहेत. त्यांच मी इथे  एम एन टी नेटवर्क चैनल वरती स्वागत करतो. 

आमच्या सर्व दर्शकांना आवाहन आहे की आपला जो एम. एन. टी. न्यूज नेटवर्क चैनल आहे तो बहुजनांसाठी निर्माण केलेला आहे. आपण आता जो लाईव्ह कार्यक्रम पाहत आहात तो फेसबुकच्या विविध ग्रुप वरती शेअर करू शकतालाईक करू शकता, कमेंट करू शकतामी आपणा सर्वांना विनंती करतो की, आपले चैनल आपणच वाढवले पाहिजे जे अत्यंत महत्त्वपूर्ण विषय चर्चेसाठी घेत आहे, अशे विषय मेनस्ट्रीम मीडिया कधीच चर्चेसाठी घेत नाही, असे महत्त्वपूर्ण विषय आपल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी मी सर्व दर्शकांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त शेअर करा. 

कार्यक्रमाला सुरुवात करताना सर्वप्रथम मी धनंजय झाकर्डे साहेब यांना प्रश्न विचारतोझाकर्डे साहेब, जो भटका विमुक्त समाज आहे याची देशपातळीवर नेमकी काय ओळख आहे? आणि महाराष्ट्र मध्ये नेमकी काय ओळख आहे? या संदर्भामध्ये आमचा जो बहुजन मूलनिवासी समाज आहे यांना महत्वपूर्ण अशी विस्तृत माहिती द्यावी ही विनंती. 

माननीय धनंजय झाकर्डे:  आपला प्रश्‍न हा भटके-विमुक्त समाजाच्या अनुषंगाने आहे की समग्रह बहुजन मूलनिवासी समाजाच्या अनुषंगाने आहे?

सूत्रसंचालक : हो सर, राष्ट्रीय स्तरावर भटका विमुक्त समाज कसा आहे, त्याची स्थिती, आणि महाराष्ट्र स्तरावर भटका विमुक्त समाज कसा आहे, आणि त्याची स्थिती?

 मा. धनंजय झाकर्डे:  ओकेमी पहिल्यांदा एम. एन. टी. न्यूज नेटवर्क चे आभार मानतो आणि आपण अत्यंत महत्त्वाची चर्चा ठेवलेले आहे की, फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क बहाल करू शकतात. हे अत्यंत सत्य आहे, त्याबद्दल मी एम. एन. टी. न्यूज नेटवर्क चे पुन्हा एकदा आभार मानून भटक्या-विमुक्त समाजाच्या अनुषंगाने मांडणी करतो. मध्यंतरी रेणके आयोग आला आणि या आयोगाने घुमंतू जातीया अशी एक वर्गवारी केली या अनुषंगाने केंद्राकडून पाऊल उचलण्याचा प्रयत्न झालेला आहे...... एकूण हा पुन्हा वेगळा वर्ग नाहीयेहा एक एस्सी. एसटी. ओबीसी. पैकीच एक वर्ग आहेजे तीन  संविधानिक वर्ग निर्माण झालेले आहेत ... 341, 342, 343 या कलमाच्या अंतर्गत. या देशातील राज्यकर्त्यांची एक मोठी चाल आहे की त्यांनी हा एक चौथा वर्ग निर्माण करून ठेवला. या वर्गाचे जे जीवनमान आहे त्या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी मी एक कविता केलेले आहे ती म्हणजेकोण आम्ही ......कोण आम्ही .....ओळख न आम्हाला.......  गावात ......न जंगलात.... नाही गावाच्या बाजूला......., कुणी म्हणते गुन्हेगार...... कुणी म्हणे वनवासी,.....उपरे ठरलो आम्ही इथले मूलनिवासी. जागा नाही राहायला..... कोण आम्ही .....कोण आम्ही ......ओळख नाही  आम्हाला.... ना गावात ना.... जंगलात..... जागा नाही राहायला आम्हाला. 

भारतामध्ये आजच्या स्थितीला जे भटके-विमुक्त म्हणून ओळखले जातात त्यांची ही ओळख आहे. तसेच त्यांना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या पाठीमागचा तो तगादा अजून संपला नाही.  बाबासाहेबांनी त्याकाळी जराईनपेशा या टरमिनोलॉजीच्या अनुषंगाने आदिम जमातीजराईनपेशा आणि अस्पृश्य वर्ग असे भाग केले. या तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं आहे, यामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये ज्याला जराइनपेशा म्हटलं जायचं ते म्हणजे गुन्हेगारी जमाती. यांची गुन्हेगारी जमाती म्हणून ओळख आहे आणि त्या काही प्रमाणात भटक्या आहेत, म्हणजे यांची नेमखी ओळखत नाही, परंतु यांना सर्वसाधारणपणे गुन्हेगार समजलं जातं. हे सर्व लोक आहेत ते या देशातले मूळनिवासी आहेत. त्यांचे सर्व  कॅराकस्टरीस्टिक संविधानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते ओबीसी सोबत जुळतात, आदिवासी सोबत जुळतात, आणि काही एस्सी सोबत जुळतात. 

तसं बाबासाहेबांनी सायमन कमिशन मध्ये सांगितलसायमन कमिशन ने बाबासाहेबांना प्रश्न विचारला कीआदिम समाजातील लोक अस्पृश्य आहेत का? तर बाबासाहेब म्हणाले, होकाही ठिकाणी त्यांच्याबरोबर अस्पृश्यतेचा व्यवहार होतोहे आहेच पण त्याच्याशिवाययांच्याकडे पाहण्याची गुन्हेगारीची जी नजर आहे त्यामुळे तर यांना जास्त सोसावं लागलं. मी एक वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोमी सांगलीमध्ये आरोग्य सेवेत कामाला होतोतर त्या ठिकाणी फासे पारधी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, काही ठिकाणी तो शेड्युल कास्ट मध्ये येतो तर काही ठिकाणी तो गुन्हेगार म्हणून समजला जातो. त्या ठिकाणी मी माझी ओळख पारधी म्हणून सांगायचो तर ते लोकांना पटायचं नाही. तशी माझी जात टाकणकर येतेपण टाकणकर म्हटल्यानंतर लोकांना समजत नाही. टाकणकर ही पारधी यामध्ये एक उपजात आहे. जेव्हा मी सांगतो की मी पारधी समाजातील आहे, तेव्हा ते लोकांना पटत नाही. कारण माझ राहणीमान, बोलणे, यामुळे. एका ठिकाणी असा अनुभव आला की एका घरी चहा पिण्यासाठी गेल्यानंतर तिथल्या महिलेने विचारले की हे तुमचे आडनाव इकडे कुठं बौद्ध धर्मामध्ये दिसत नाहीमग तुमची ही आडनावं कशी कायमग मी त्यांना सांगितलं की आम्ही पारधी आहोत, कारण जय-भीम म्हणत असल्यामुळे तिला असं वाटलं की हे बौद्ध आहेत. पण जेव्हा मी सांगितलं की मी पारधी समाजातला आहे तेव्हा ती अक्षरशः बेशुद्धच पडली, तिला आम्हाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले आणि हातातला चहा हातातच राहिला. तर अशाप्रकारे हि जी तिरस्काराची भावना आहे ती तिरस्काराची भावना एकूणच पूर्ण देशभर भटक्या-विमुक्तांच्या संदर्भात दिसून येते आणि एकूणच भारतात या भटक्या-विमुक्तांची एक प्रकारची अशी कोणतीच ओळख निर्माण झालेले नाही. त्यामुळे त्यांना जर न्याय हक्क मिळवायचे असतील तर त्यांनी फुले-आंबेडकरी वादाकडे पाहिला पाहिजे, फुले आंबेडकरी विचार स्वीकारला पाहिजेतो विचार स्वीकारून त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे, तरच त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवता येतील असं मला वाटतं. 

सूत्रसंचालक: ओके सरबाकी गोष्टी पुढच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला विचारण्यात येईलच. मी पुढच्या वक्त्यांना आमंत्रित करतो. मा. उत्तम मदने सर आहेत ते रिसर्च स्कॉलर आहेतत्यांचा या क्षेत्रामध्ये खूप अभ्यास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल्स या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अस दिलेल आहे की, आपल्या देशांमध्ये जो एक मोठा वर्ग आहे तो भटक्या-विमुक्त वर्ग आहे, आदिवासी वर्ग आहे, आणि अस्पृश्य वर्ग आहे. त्याच्या प्रस्तावना मध्ये बाबासाहेब सांगतात की, ही जी अस्पृश्यता आहे ती चुकीची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात ही अस्पृश्यता चुकीचे आहे, एवढा मोठा वर्ग आपल्या समाजामध्ये आहे आणि या अस्पृश्यतेचा उगम कुठून झाला याचा अभ्यास अजून कोणीही केलेला नाही, आणि त्यामुळे त्याचं खरं स्वरूप काय आहेती किती वाईट गोष्ट आहे, याची जाणीवच होत नाही. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की अस्पृश्यता असणे हा आमच्या जिवनाचा एक भागच आहे. तसच भटका विमुक्त समाजही आपला देशांमध्ये आहे, आणि त्या समाजाच्या ही काही व्यथा आहेत, आणि त्यांच्याबरोबर आज पर्यंत जे काही घडल आहे ते चुकीच आहे, अशी भावना आपल्या देशांमध्ये उभी करण्यात आलेले नाहीये. कारण आपल्या देशांमध्ये याच्यावरती विविधांगी असा अभ्यास झालेला नाहीये, किंवा लोकांना त्यासंदर्भात जागृत केलं गेलेलं नाहीये. तर मा. मदने सरांना माझा असा प्रश्न आहे कि रिसर्च स्कॉलर म्हणून भटक्या विमुक्त समाजाची परस्थिती काय जाणवते? भटक्या-विमुक्त समाजाचे खरे प्रश्न काय आहेत? आणि त्याला कशा पद्धतीने तुम्ही पाहता

मा. उत्तम मदने: तसं पाहायला गेलं तर भटक्या विमुक्तांच आत्ता सध्याचे चित्र हे खूपच विदारक चित्र आहेभटक्या-विमुक्तांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर त्यांचे सामाजिक प्रश्न काय आहेत, आर्थिक प्रश्न काय आहेत, शैक्षणिक प्रश्न काय आहेत, आरोग्याचे प्रश्न काय आहेत, किंवा एकंदरीतच त्यांच्या हक्काचे प्रश्न काय आहेत, अशा अनुषंगाने पाहायला गेलं तर या प्रश्नांची खूप मोठी अशी लिस्ट बनू शकते. आपण जर सामाजिक प्रश्नाच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलो तर, आज भटके-विमुक्त म्हणून महाराष्ट्रामध्ये 14 मूळच्या विमुक्त जाती आणि 28 या मूळच्या भटक्या जमाती आहेत, आणि कालांतराने त्यामध्ये वाढ होत गेलेली आहे. मग ते 1990 ला असेल, 1993 - 94 च्या दरम्यान असेलतर अशा पद्धतीने ते वारंवार वाढ होत केलेले आहे. आजतागायत जर गव्हर्मेंट रेकॉर्ड नुसार पाहायल गेलं तर, 14 विमुक्त जाती आणि 37 ह्या भटक्या जाती पाहायला मिळतात, या मेन जाती आहेत परंतु या जातींच्या सब जाती खूप साऱ्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला भटक्या-विमुक्तांनमध्ये येणाऱ्या खूप साऱ्या जाती आणि खूप सारी लोकसंख्या महाराष्ट्र मध्ये आणि एकंदरीतच भारतामध्ये पाहायला मिळते. सामाजिक प्रश्नाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहायला गेलं तर, वेगवेगळ्या सिच्युअशन किंवा परिस्थितीमध्ये भटक्या-विमुक्त समाजाचे आपल्याला एक्ष्क्लुजन झालेलं दिसतंमग समाजामध्ये एकंदरीतच त्यांच्यावर आपल्याला वेगवेगळे व्हायलन्स होताना दिसत आहेत, त्यांच्यासाठी प्रोटेक्शन काही नाही आहे. आता रिसेंट ची घटना पाहिल्या तर, बीडमध्ये केज मध्ये पारधी समाजावर झालेला हल्ला असेल किंवा मंगळवेढा तालुक्यातील जे भिक्षेकरी भिक्षा मागण्यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये आलेले होते त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेल मॉब लिंचींग असेल, अशा खूप सार्‍या घटना आपल्याला भटक्यांन बरोबर गावोगावी झालेल्या पाहायला मिळत आहेत. अशाप्रकारे व्हायलन्स भटके-विमुक्त लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर सोसावा लागत आहे. 

त्याचबरोबर ज्या विमुक्त जाती आहेत त्या 1871 पासून ब्रिटिशांनी जो क्रिमिनल ट्रायब ॲक्ट बनवला तेव्हापासून भटक्या-विमुक्त समाजावर जो गुन्हेगारीचा शिक्का बसलेला आहे, या गुन्हेगाराच्या शिक्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप सार्‍या समस्या येत आहेत, आणि त्यांना त्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्यावर बसल्यामुळे पूर्ण समाज त्यांच्याकडे गुन्हेगार नजरेतून पाहत आहे, एक व्यक्ती, दोन व्यक्ती गुन्हेगार न करता पूर्ण समाजच आज गुन्हेगार ठरवला जात आहे, याचाही खूप मोठा फटका भटक्या विमुक्त समाजाला बसत आहे. त्याचबरोबर लॅक ऑफ एज्युकेशन हा एक मोठा प्रश्न भटक्या विमुक्त समाजाला भेडसावत आहे, मंग हे भटके-विमुक्त लोक म्हणजे कोण आहेततर भटके म्हणजे असे लोक की जे लोक एका गावाहून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा गावातून शहरात भटकंती करत आहेत आणि आपला उदरनिर्वाह शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, मग तो उदरनिर्वाह या समाजव्यवस्थेने त्यांच्यावर ओढून दिलेल्या परिस्थितीमुळे असेल किंवा त्यांच्या परंपरागत व्यवसाय आहेत ते व्यवसाय करून ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेतभटक्या-विमुक्त समाजातील लोकांकडे स्वत:च अस घर नाही, जमीन नाही, त्यामुळे त्याचे वास्तव्याचे अशे प्रमुख ठिकाण नाही. अशा या सततच्या भटकंतीच्या परिस्थितीमध्ये त्यांची मुलं शिक्षण कुठे घेतले, भटक्या विमुक्त समाजापैकी खूप थोडे लोकं एका ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आणि मेजॉरिटी समाज अजूनही भटकंती अवस्थेतच आहे. तर मग अशा या भटकंतीच्या अवस्थेमध्ये या समाजातील मुलं रेगुलर स्कूलमधून शिक्षण कसे काय घेऊ शकतील? अशा प्रकारे ही शिक्षणाची एक समस्या त्यांना भेडसावत आहे. 

आरोग्याच्या संदर्भात जर विचार करायला गेलं तर कुठेच एका गावच रहिवासी नाही, सतत भटकंती आहे, त्यामुळे ऊन वारा पाऊस त्यांना सहन करावा लागत आहे. पालावरचं जीवन जगावे लागत आहे, आणि या भटकंतीच्या दरम्यान त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अब्युजिंग चे प्रकार होत आहेत आणि प्रामुख्याने भटक्या-विमुक्त समाजातील मुली आणि महिला या अब्युजिंगला बळी पडताना दिसतात. या समस्या बरोबरच जे पब्लिक प्लेसेस आहेत किंवा कॉमन रिसोर्सेस आहेत की ज्यांच्यावर सर्वांचा हक्क आहे, अशा कॉमन रिसोर्सेसचा ॲक्सेस भटक्या-विमुक्त लोकांना मिळतच नाही. खूप रेअर  ठिकाणचे खूप रेअर लोक आहेत की ते कॉमन रिसोर्सेसचा फायदा उठवत आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला अशा प्रकारच्या खूप समस्या पाहायला मिळतात. 

आर्थिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर, आजच्या मॉडर्ननायझेषणच्या युगामध्ये भटका विमुक्त समाज त्यांचे परंपरागत व्यवसाय करत आहे ते व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे, हे परंपरागत व्यवसाय कोणते तर, डोंबारी, माकडवाले, अस्वल वाले, कोल्हाटी, सापवले इत्यादी. आपण जर या समुदायाला त्यांच्या व्यवसायानुसार विभागणी केली तर करमणूक करून पोट भरणारे भटके, प्राण्यांच्या किंवा पक्षांच्या सहकार्याने जीवन जगणारे भटके, पशुपालक किंवा प्राण्याच्या साह्याने जगणारे किंवा जंगलातील वस्तूंवर उदरनिर्वाह करणारे भटके, अशा प्रकारे आपल्याला भटक्या-विमुक्तांच्या त्यांच्या व्यवसायानुसार कॅटेगरी करता येतील, काही भटक्या विमुक्त जाती अशा आहेत की त्या फक्त भिक्षा मागूनच जगत आहेत. अशा प्रकारे आपण भटक्यांना वेगवेगळ्या गटात व्यवसायानुसार विभागणी करून पाहू शकतो, या व्यवसायाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर आपल्याला वेगवेगळे कायदे येतानी दिसत आहेत. पक्ष्यांच्या संदर्भात कायदे आलेले आहेत, फोरेस्ट संदर्भात कायदे आलेले आहेत, या कायद्यामुळे भटके-विमुक्त लोकांवरती वेगवेगळे निर्बंध आलेले आहेत, हे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे खेळ करू शकत नाहीत, पोलिस येतात आणि डायरेक्ट त्यांना उचलतात. भिक्षा मागून जगणारा खूप मोठा समाज आहे परंतु आज आपल्याकडे त्या संदर्भात कायदा असल्यामुळे भिक्षा मागणाऱ्या समाजावर..................................................

सूत्रसंचालक: मदने सर, मदने सर, मी तुम्हाला येथे थांबवतो, पुढे आपल्याला आणखीन या विषयावर चर्चा करायचीच आहे. पुढच्या राउंडला पण या वरती चर्चा करूयात. आता मी डॉक्टर विजय माने सरांकडे येत आहे, डॉक्टर माने सर, आपण खूप खडतर प्रवास करून वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलेले आहे.  आपल्याला असं दिसतंय की आदिवासी समाज हा कमीत कमी जंगलामध्ये कुठेतरी स्थायी झालेला आहेओबीसी समाज आहे, शेड्युल कास्ट समाज आहे, तोही एका ठिकाणी स्थायिक झालेला आहे. परंतु भटका विमुक्त समाज तांड्यावर राहतो आणि वर्षातून अनेक वेळा स्थलांतर करत राहतोना त्याच्याकडे रेशन कार्ड आहेना आधार कार्ड आहे. त्याच्याकडे त्याची ओळख स्थापित करण्यासाठी कोणतेच असे डॉक्युमेंट नाहीये. अशा समाजाच्या युवकांनी उच्च शिक्षण घेतल्याशिवाय त्त्यांची प्रगती कशी होईल? आपण त्याच्या संदर्भामध्ये माहिती द्यावी. 

डॉ. विजय माने: सर्वप्रथम मी एम. एन.  टी. न्यूज नेटवर्क चैनलच आभार मानतो, त्यांनी मला या कार्यक्रमांमध्ये बोलावलं. तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याच्या अगोदर झाकर्डे  सरांनी जी पार्श्वभूमी सांगितली, समाज तीन भागात कसा विभागला गेला. एकसंघता कशी तोडली जाते. मदने सरांनी भटके विमुक्तांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, हक्क, इतिहास याच्या बद्दल सांगितलं. आपल्याला माहित आहे कि अनादी काळापासून भटके-विमुक्त हे अनेक ग्रुपमध्ये विभागले आहेत, आणि त्याच्यामुळे काय झालेला आहे, त्यांना एका ठिकाणी राहता येत नाही, त्यांचे प्रश्न आहेत ते कागदपत्रांचे आणि त्यांच्या आयडेंटिटी चेकागदपत्र मिळवून देण्यासाठी काही संस्था काम करत आहेत, परंतु लोकांची पण जबाबदारी आहे की त्या संस्थांना कस भेटल पाहिजे. मुलांना शिक्षण देण्यासाठी भविष्यात त्यांना कागदपत्रांचा उपयोग होऊ शकतो. कागदपत्र नसेल तर शिक्षणासाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. शिक्षण नसेल तर आपन वंचित राहू शकतो आणि वंचित राहिल्यामुळे समाजात काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे आपल्याला माहीतच आहे.  (भाग -२ वाचा)

“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - १) 


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - २) 


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - ३) 


Saturday, 11 July 2020

ग्रामीण जीवनात लॉकडाउनचा परिणाम

ग्रामीण जीवनात लॉकडाउनचा परिणाम 
उत्तम मदने
पूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटातून जात आहे, जगातील प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, या प्रयत्नांमध्ये पूर्ण लॉक डाऊन करणे, फिजिकल डिस्टन्स मेंटेन करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे इत्यादी, तसेच प्रत्येक देशातील संशोधक  कोरोना  महामारीवर लस शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहे, अशाप्रकारे पूर्ण जग या महामारीतून वाचण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

भारतात कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू जाहीर केला, या जनता कर्फ्यूला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला, हा भरभरून मिळालेला प्रतिसाद पाहता, 24 मार्च 2020 पासून देशांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला. कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता वेळोवेळी या लॉकडाऊन मध्ये वाढ करण्यात आली. या लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये देशातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, कामगार, व्यापार, शेती इत्यादी क्षेत्रावर खूप मोठा परिणाम पडलेला दिसून येत आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. 

अशाच वेगवेगळ्या अडचणींना तोंड देणाऱ्या क्षेत्रापैकी ग्रामीण भागातील शेती, छोटे-मोठे उद्योग, आणि ग्रामीण जीवन यावर देखील लॉक डाउन कालावधीमध्ये, पाठीमागील तीन ते चार महिन्यांमध्ये मोठा परिणाम झालेला दिसून येतो. शेतकरी वर्गाला याची फार मोठी झळ बसलेली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जी पिके घेतली होती त्याच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळामध्ये मार्केट उपलब्ध झालेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक संकटाला सामना द्यावा लागला. मार्च, एप्रिल, मे महिन्यादरम्यान द्राक्षे, कलिंगड, खरबूज, तसेच आंब्याचा सिझन असतो. या सीजन मध्ये शेतकरी या फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतात आणि शेतकऱ्यांना हाच कालावधी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरत असतो. परंतु याचा कालावधी मध्ये कोरोना परिस्थितीमुळे सर्व बाजारपेठा बंद राहिल्या त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता आला नाही. लॉक डाऊनच्या काळामध्ये मेडिकल आणि फळ विक्रेते ही सेवा जरी चालू असली तरी शेतकऱ्यांकडून जी फळे विकत घेतली जात होती त्याचे दर अत्यंत कमी होते, त्याच्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी केलेल्या खर्चाची ही भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना आपला माल विकता आला नाही त्यांनी तो आपल्याच आजूबाजूच्या गावांमध्ये देऊन टाकला. जे शेतकरी भाजीपाल्याचे  उत्पन्न घेतात त्या शेतकऱ्यांना तर खूप मोठा फटका बसला आहे, कारण या कालावधीमध्ये गावोगावचे बाजार बंद झाले, शहरातील भाजीपाल्याची मोठी मार्केट बंद झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला कुठेच विकता आला नाही. आज-काल भाजीपाला पीकवण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते, शेतीची मशागत करण्यापासून, भाजीपाला लावने त्याची देखभाल करणे, औषधांची फवारणी करणे, भाजीपाला तोडणे, व मार्केटला पाठवणे या सगळ्या प्रक्रियांमध्ये शेतकरी मोठी गुंतवणूक करत असतो, ही गुंतवणूक केल्यानंतर त्याला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्याला उत्पन्न तर मिळालंच नाही परंतु शेतात पिकवलेला भाजीपाला काही शेतकऱ्यांनी तसाच शेतात कुजण्यासाठी सोडून दिला, काही शेतकऱ्यांनी घरी पाळलेली जनावरे आहेत त्यांना घातला, यातूनही काही शेतकऱ्यांनी छोट्या-मोठ्या अपेक्षा ठेवत शेतातून पिकवलेला भाजीपाला गावोगावी फिरून विकण्याची तयारी दाखवली आणि त्यातून जगण्यासाठी थोडेफार उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांना त्यात फारसे काही उत्पन्न मिळू शकले नाही.  शेतकरी कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावरच असल्यामुळे आणि या लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये शेतीतील कुठल्याच उत्पादनाला मार्केट उपलब्ध न झाल्याने, तो विकता न आल्याने, शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांची परिस्थिती खूपच बिकट झालेले आहे, कारण शेतीतून उत्पादन घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पाहिजे तेवढे भांडवल उपलब्ध नसते, अशा वेळेस शेतकरी सावकार, बँका इत्यादी ठिकाणावरून कर्ज घेत असतात, त्या कर्जातून आपली शेती कसत असतात, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाचे हफ्ते फेडणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे याची स्वप्ने तो पाहत असतो. परंतु त्याच्या या स्वप्नांवर पूर्णतः पाणी फिरले आहे. त्याच्या हातामध्ये पूर्णतः निराशा पडलेली आहे. आत्ता पाऊस झाला आहे तर नवीन पेरणी साठी किंवा जमिनीची मशागत करण्यासाठी लागणारा पैसा किंवा भांडवल कुठून आणावे हा डोंगराएवढा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे, कारण अगोदरच बॅंकांकडून घेतलेले किंवा सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे नवीन कर्ज मिळण्याची कोणतीच अपेक्षा त्याला दिसत नाही. अशाप्रकारे शेतकरी बांधवांची चारही बाजूंनी मोठी कोंडी झालेली आहे, आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विचारात गुंतून तो हताश होऊन बसला आहे. 

शेतकऱ्यांबरोबरच ग्रामीण भागात लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे तो वर्ग म्हणजे भूमिहीन शेतमजूर. कारण जरी आपल्याला असे वाटत असेल की, लॉकडाऊनमुळे शहरातीलच उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या बंद झाल्या आणि कामगार घरी बसले. परंतु या लॉकडाऊनचा परिणाम ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजुरांनवरही झालेला दिसून येतो, कारण प्रत्येक शहरातील भाजीपाला मार्केट बंद होणे, यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल मार्केटमध्ये पाठवता आला नाही, परिणामी भाजीपाला तोडणे त्याची वर्गवारी करणे त्याच पॅकिंग करणे या सर्व गोष्टी हे शेतमजूर करत असतात आणि शेतीतील हीच कामे बंद झाल्याने या भूमिहीन शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झालेला नाही. या सर्व शेतमजुरांचे हातावरचे पोट आहे, त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या येणाऱ्या दिवसाच्या मजुरीवरच चालत असतो, हीच मजुरी बंद पडल्यामुळे आपण आपल्या कुटुंबाला काय खाऊ घालणार हा प्रश्न शेतमजुरांच्या  समोर पडलेला आहे. पाऊस पडल्यानंतर शेतीची कामे चालू होतात, शेतमजुरांना चांगला रोजगार मिळण्याची अपेक्षा असते, परंतु आत्ता अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की भांडवलाच्या अभावामुळे शेती कशी पिकवायची हा प्रश्न त्याच्या समोर उभा आहे, त्यामुळे तो शेतमजुरांना आपल्या शेतामध्ये काम देखील देऊ शकत नाही.  

ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाबरोबरच लॉकडाऊनचा मोठा फटका आदिवासी समुदायाला बसलेला दिसून येतो. अन्‍न व पोषण सुरक्षेच्या दृष्टीने आदिवासी समुदाय सर्वात असुरक्षित आहे. शेतीवर आधारित कामाव्यतिरिक्त आदिवासी समुदाय जंगलातून वेगवेगळी पाने, महु झाडाची फुले इत्यादी उत्पादनाचे संकलन व त्याची विक्री करतात, त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो, परंतु या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये उत्पादनाचे कलेक्शन करण्यासाठी कोणी एजंट आले नाहीत आणि मार्केट बंद असल्यामुळे त्यांना ते विक्री करता आलं नाही. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला मुलाबाळांना कसे सांभाळावे हा प्रश्न आदिवासी समुदायासमोर उभा आहे. ग्रामीण भागामध्ये अनौपचारिक क्षेत्र पतपुरवठा करत असतो किंवा पतपुरवठा करण्याचा तो एक मुख्य स्त्रोत आहे,  परंतु चहूबाजूंनी लोकांचे झालेली कोंडी पाहून कर्जाच्या व्याजामध्ये बऱ्याच ठिकाणी वाढ करण्यात आली, त्यामुळे ग्रामीण भागातील लोक कर्जही घेऊ शकले नाहीत याचा मोठा फटका आदिवासी बांधवांमध्ये बसलेला दिसून येतो.

भारत सरकारने 15 एप्रिल 2020 रोजी घोषणा करून देशातील लॉक डाऊन कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढवण्यात आला, त्याचबरोबर भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या, त्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्योत्पादन, आणि संबंधित कामांना  लॉकडाऊन निर्बंधापासून मुक्त ठेवण्यात आले,  तसेच मजूर कामावर जाऊ शकतात, बाजारपेठा उघडल्या जातील, बाजारपेठेत खरेदी विक्री होईल, कृषी इनपुट दुकाने आणि कृषी प्रक्रिया केंद्र कार्यरत होतील या सर्वांन बरोबरच ग्रामीण भागातील मनरेगा चे काम सुरू होईल अशा सूचना देण्यात आल्या. परंतु याचा फारसा परिणाम ग्रामीण भागातील निर्माण झालेले परस्थिती सुधारण्यावर झालेला दिसून येत नाही. सर्व गोष्टी बंद झाल्यामुळे त्या लगेचच पूर्ववत होणे शक्य नाही. 

दिवसेंदिवस ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी कमी आणि शहरी भागात रोजगाराच्या संधी जास्त अशा परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनतेचा शहरी भागात स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले होते, शहरात जी मजुरीची कामे मिळतील ती कामे करण्यासाठी हा मजुर वर्ग ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर करत होता. ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर करणारे मजूर हे अल्पभूधारक शेतकरी कुटुंब व भूमिहीन शेतमजूर कुटुंब यांच्यातील सदस्य आहेत. लॉकडाऊनमुळे शहरी भागातील सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने हे मजूर आपल्या गावी परतले आहेत. मेट्रो सिटी मधून किती मोठ्या प्रमाणावर हे मजूर आपापल्या गावी पायपीट करत कसे गेले याची प्रचिती आपल्याला विविध प्रसारमाध्यमातून आलेलेच आहे. शहरी भागातून ग्रामीण भागात आलेले हे सर्व मजूर आपल्या कुटुंबाबरोबर ग्रामीण भागात राहत आहेत, शहरी भागात उद्योगधंदे सुरू करण्याची प्रक्रिया चालू झाली असली तरी मोठ्या प्रमाणात अजून तरी हा मजूरवर्ग ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित झालेला दिसत नाही. शहरातून ग्रामीण भागात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा बोजा त्यांच्या ग्रामीण भागातील मूळ कुटुंबावर येऊन पडलेला आहे आणि त्यातच आणखीन ग्रामीण भागातील शेतीची व शेतमजुरांची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांच्यावर हे एक खूप मोठे बर्डन निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात मजुरी मिळत नसल्यामुळेच ही कुटुंबे ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित झाले होती, तर मग आता यांना ग्रामीण भागात मजुरी कोठून मिळेल, या सर्व परिस्थितीमुळे या मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेले आहे. 

कोरोना वायरच्या उद्रेकानंतर भारतातील ग्रामीण भागात सर्वात मोठा फटका बसलेले क्षेत्र म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योग, भारतात नोंदणीकृत सूक्ष्म आणि लघुउद्योग संस्थांची संख्या एक कोटी पेक्षा अधिक आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर वर्गाला व मालक वर्गाला कोरोना व्हायरस मुळे घोषित केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील सूक्ष्म आणि लघु उद्योगाचा देशाच्या जीडीपी तील वाटा 29 टक्के इतका आहे, एवढा मोठा वाटा असणारा उद्योग ठप्प झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. सूक्ष्म व लघु उद्योगात काम करणारा कुशल व अकुशल कामगार आपापल्या गावी परतला आहे, तसेच या उद्योगांना कच्चा मालाची जी सप्लाय होत होती त्या सर्व सप्लाय खंडित झाल्या आहेत. े उद्योग चालवणार्‍या उद्योजकांकडे असलेल्या ठेवी संपत आलेल्या आहेत, आता पुन्हा हे उद्योग चालू होत आहेत तर उद्योजकांना कुशल कामगारांची कमतरता बासू लागली आहे. अशा परिस्थितीत हे उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योजकांना कुशल कामगार आणि अर्थपुरवठा तसेच बाजारपेठ या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सूक्ष्म व लघु उद्योगाचा देशाच्या जीडीपी तील वाटा पाहता केंद्र सरकारने हे लघुउद्योग पुन्हा उभे करण्यासाठी कर्ज देण्याची घोषणा केली आहे परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होऊन कर्ज मिळून हे उद्योग चालू होण्यास किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. 

अशा प्रकारे लॉकडाऊनमुळे ग्रामीण जीवनावर आर्थिक दृष्टिकोनातून झालेला परिणाम थोडक्यात दिसून येतो. 

उत्तम मदने 
जुले ११, २०२०.